• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: धनत्रयोदशीला कशी करावी पूजा; कुठल्या राशीला लाभकारक दिवस?

राशीभविष्य: धनत्रयोदशीला कशी करावी पूजा; कुठल्या राशीला लाभकारक दिवस?

दिनांक 2 नोव्हेंबर 2021 वार मंगळवार. आज धनत्रयोदशी. धन्वंतरी पूजन. या दिवशी यमदीपदान केले जाते. तुमचा आजचा दिवस कसा असेल वाचा..

  • Share this:
आज दिनांक 2 नोव्हेंबर 2021 वार  मंगळवार. आजपासून प्रकाश पर्व दीपावलीची सुरुवात होत आहे. आज धनत्रयोदशी. धन्वंतरी पूजन. आज यमदीपदान केले जाते. मातीचा मोठा दिवा तेल वात घालून दक्षिण दिशेला पेटवून ठेवावा.  अपमृत्यूपासून संरक्षण व्हावे, घरावरील गंडांतर टळावे ,यासाठी हा दिवा रात्र भर ठेवावा. धन्वंतरी  पूजन करावे. एका वाटीत धणे आणि गूळ घेऊन त्याची पूजा करावी. तसेच काही नवीन वस्तू खरेदी करावी. सर्वाना धनत्रयोदशीच्या  हार्दिक शुभ कामना . मेष आज दिवस थोडा संथ आहे. नवीन काम,निर्णय टाळा  आर्थिक स्थिती ठीक राहील.घरात खूप खर्च होईल. शत्रू पासून सावध रहा.  दिवस मध्यम जाईल.अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सांभाळून राहण्याची गरज आहे. वृषभ आज मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. . मुलांना समजून घेणे आवश्यक राहील  जोडीदाराकडून मोठे  उपहार मिळतील. मानसिक ताणतणाव कमी होतील.  दिवस चांगला जाईल. मिथुन चंद्राचे  चतुर्थ स्थानात भ्रमण असणार आहे. आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी फार काम राहणार आहे. नवीन अडचणी येतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. घराकडे लक्ष देणे गरजेचे राहील  दिवस शुभ आहे. कर्क चतुर्थ स्थानात आता   रवि बुध  मंगळ असे तीन ग्रह आहेत . आईवडील भेटणार आहेत.त्यांची काळजी घ्या. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती सुख चांगले. प्रवास योग येतील. दिवस सर्व सामान्य पणे जाईल. सिंह आज आर्थिक भरभराट  होईल. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून प्राप्तीचे योग आहेत. फार अपेक्षा नकोत.  नवीन काही सुरू करणे टाळा.. दिवस चांगला. कन्या आज राशीतील   ग्रह ताण  तणाव निर्माण करतील. दिवस अस्वस्थ पार पडेल. राशी च्या धन स्थानात आलेला मंगळ, बुध त्वचा रोग निर्माण करेल. रागीट स्वभाव होईल.  धार्मिक कार्य ठरतील. दिवस उत्तम. तुला प्रकृतीची काळजी, मानसिक ताण, आणि थकवा असा आजचा दिवस आहे. नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी येऊ शकते. राशी च्या तृतीय स्थानातील शुक्र सुखद  लाभ देणार आहे.  ईश्वरी उपासना करावी. दिवस मध्यम जाईल. वृश्चिक घरात होणार्‍या अवाजवी खर्चाला आता  कात्री लावणे गरजेचे  आहे. लाभ स्थानातील चंद्र भ्रमण आज काही मित्रांची भेट घडवून आणेल. संतती सुख उत्तम. नोकरीमध्ये संभाळून निर्णय घ्या.  दिवस प्रवासाचा  आहे.. धनु आजचा दिवस ऑफिस मध्ये  जास्तीची जबाबदारी, ताण आणि काही आवश्यक निर्णय घेण्याचा आहे. घराकडे लक्ष द्या.  जोडीदाराची साथ  लाभेल . एकूण मिश्र दिवस आहे. मकर भाग्य स्थानातील चंद्र, रवि मंगळ, बुध ग्रह उत्तम भाग्याची साथ  मिळवून देतील. छोटे प्रवास किंवा त्याची आखणी, असा हा दिवस आहे. भावंडाची साथ मिळेल.  उपासना करावी. नोकरीमध्ये उत्तम संधी येतील. धार्मिक कार्य घडेल. शुभ दिवस. कुंभ आज दिवस संथ, कंटाळवाणा जाईल. अमावास्या चिंतेची.   नवम स्थानातील चार ग्रह प्रवासाचे संकेत देत आहे. जास्तीची कामे त्रास देतील. शरीर साथ देणार नाही. गृह चिंता सतावू  शकते. त्यासाठी खर्च होईल. जपुन रहा  असा संकेत आहे. मीन. तुमचे  आपल्या जोडीदाराशी सूर जुळतील. मात्र अष्टमात आलेला   मंगळ, बुध ,रवि काळजीपूर्वक रहा असे सुचवत आहे.जोडीने  प्रवास, खरेदी कराल  मुलांची उत्तम प्रगती होईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक गोष्टींवर खर्च कराल  दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
First published: