• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: आजच्या चंद्रग्रहणाचा काय परिणाम जाणवणार?

राशीभविष्य: आजच्या चंद्रग्रहणाचा काय परिणाम जाणवणार?

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

आज 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवार. आज कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा. आज मंदिरांमध्ये काकडा पेटवून आरती केली जाते. तुलसी विवाह समाप्ती होईल. आज वर्षातले शेवटचे आणि सर्वांत मोठे चंद्र ग्रहण आहे.

  • Share this:
आज 19 नोव्हेंबर 2021 शुक्रवार.  आज कार्तिक पौर्णिमा  म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा. आज मंदिरांमध्ये काकडा पेटवून , आरती केली जाते. तुलसी विवाह समाप्ती होईल. आज वर्षातले  शेवटचे  चंद्र ग्रहण आहे. भारतात ते पूर्वोत्तर भागातून आंशिक रूपाने दिसणार आहे. आज चंद्र  वृषभ राशीतून  भ्रमण करेल. तर सूर्य  वृश्चिक  राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष मेष व्यक्ती ना आज  दिवस अनुकूल आहे. कौटुंबिक आणि आर्थिक व्यवहार  याकडे  लक्ष पुरवावे लागेल. नवीन संधी मिळेल. अनेक लाभ होतील. पौर्णिमा काळात नामजप, उपासना  करावी. दिवस आनंदात जाईल. वृषभ आज राशिस्थानी  होणार असलेली चंद्र राहू  ही ग्रहस्थिती सांभाळून रहा असे सुचवते  आहे. मन उद्विग्न झाले  तर ओम  रं राहवे नम: ह्या मंत्राचा  जप करावा. ग्रहण काळात  दान करावे. निर्णय नकोच. दिवस मध्यम . मिथुन हजरजबाबी, प्रसन्न  मिथुन राशीच्या व्यक्तींना व्ययस्थानातील ग्रहांची  हजेरी थोडी  त्रास द्यायचा प्रयत्‍न करेल.दिवस  शांततेत घालवा. नामस्मरण करा. ग्रहण  काळात शिधा दान  करणे  फार  फायद्याचे असते. दान करा. कर्क राशि स्वामी चंद्र राहु सोबत आहे. मानसिक आंदोलने होतील. मंगळ प्रकृती सांभाळा.असे सुचवत आहे. प्रवास योग येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. ग्रहण काळात पांढऱ्या वस्तू दान कराव्या. सिंह सिंह राशीचे लोक मानी  असतात. सध्या कामाच्या ठिकाणी  ताण  जाणवू शकतो. तृतीय असलेला मंगळ खर्चात वाढ करणारा आहे. शुक्र कलेत रुची वाढवेल. दिवस चांगला आहे. ग्रहण  काळात  नामस्मरण, दान करावे. कन्या धन स्थानातील मंगळ ग्रहांची  उपस्थिती  नवीन संधी  मिळवून देईल.,खर्च वाढेल. ग्रहण काळात  ईश्वरी उपासना ,दान करावे. चतुर्थ शुक्र घरात आनंदाची बातमी आणेल. संतती सुख चांगले राहील. तुला राशी स्थानातील ग्रहाची गर्दी   प्रकृतीची काळजी  घेण्याचे सुचवते आहे .अष्टम चंद्र राहू मन उद्विग्न ठेवेल. राशीतील मंगळ बुध  आर्थिक स्थिती मध्यम ठेवेल. .  अन्न दान आणि  उपासना  करावी .दिवस मध्यम आहे . वृश्चिक अत्यंत ऊर्जावान ,रागीट, कार्य कुशल  अश्या या व्यक्ती सध्या  ग्रहण दोषा च्या  प्रभाव  क्षेत्रात  आहेत. तपासण्या करणे  आवश्यक ठरेल. जपून रहा. राशीतील  केतू हा आध्यात्मिक उन्नती  साठी  अनुकूल आहे. चंद्र राहू जोडीदाराची काळजी घ्या असे सुचवीत आहे. धनु आरोग्याची  काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा . कुटुंबातील व्यक्ती  भेटू शकतात.  मंगळ रवि  धार्मिक निष्ठा वाढेल. ग्रहण काल हा नुकसानीचा असू शकतो.  जपून रहा.  दिवस मध्यम जाईल. मकर या राशीचे लोक अत्यंत  चिकाटीने काम करणारे, शांत, स्थिर बुद्धी  असे असतात. मंगळ बुध युती आहे. सांभाळून रहा. दिवस  काही वाचन, अध्ययन करण्यात घालवा. शनी  देवांची उपासना  करा. ग्रहणाच्या निमित्त  काही दान करा . कुंभ कुंभ व्यक्ती आज घरात वेळ  घालवतील. जास्तीचे काम उरकून घ्या.  घरातील व्यक्तींच्या सोबत रहा. कार्यालयीन कामकाज करण्यात  वेळ  जाईल. जप करा. दिवस चांगला मीन आज ज्यांना फोन करायचा राहिला असेल त्यांच्या शी संपर्क होईल. बहिण भावंड भेट  .छोटासा प्रवास घडेल . घरात  शुभ कार्याचे नियोजन कराल.   दान करा. दिवस  समाधान कारक आहे. शुभम भवतु ..
First published: