Home /News /astrology /

राशीभविष्य: कन्या राशीला परदेश योगाची बातमी; कुंभ राशीने सांभाळा

राशीभविष्य: कन्या राशीला परदेश योगाची बातमी; कुंभ राशीने सांभाळा

आज बुधवार दिनांक दिनांक 19 जानेवारी 2022. पौष कृष्ण द्वितीया. चंद्राचं आश्लेषा नक्षत्रातलं भ्रमण मकर, मीन, वृश्चिक राशीला शुभ फळ देणारं आहे. काय आहे तुमच्या राशीचं आजचं भविष्य?

आज बुधवार दिनांक दिनांक 19 जानेवारी 2022.  पौष कृष्ण द्वितीया. आज चंद्र आश्लेषा  नक्षत्रांतून भ्रमण करणार आहे. पाहू या आजचे राशी भविष्य. मेष आज दिवस  कष्ट देणारा आहे. काही प्रमाणात मानसिक, शारीरिक त्रास, नोकरीच्या ठिकाणी जास्तीची काम,  जास्तीचा आर्थिक ताण, घरात जास्त जबाबदारी, असा दिवस असून फार अपेक्षा करू नयेच  .. कोणाशी शत्रुत्व नको. दिवस मध्यम . वृषभ आज ईश्वर चरणी मन रमेल. मुलं मनासारखी वागतील. चंद्र शनि दृष्टी योग  मनाला हुरहूर लावणारा आहे. आर्थिक दृष्टय़ा दिवस बरा आहे. प्रवास योग येतील. . दिवस  चांगला जाईल. मिथुन आज कामाला कंटाळून तुम्ही घरात राहणे पसंत कराल. एकूण काय तर आज घरकाम जास्त पडेल. काही खरेदीही होण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल.. घरात शांतता भंग होऊ देऊ नका. दिवस चांगला आहे. कर्क राशी  स्थानातील चंद्र  आणि  सप्तम बुधामुळे उत्तम व्यवसाय योग आहे. आज  चंद्र महत्त्वाचे फोन  नातेवाईकांच्या भेटीगाठी घडवून आणेल. कोणाशीही वाद करू नका. प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल. सिंह सूर्य प्रगतीचे  मार्ग प्रशस्त करीत आहे. राहू दशमात कामाच्या ठिकाणी बदल घडवून आणेल .आज चंद्र आर्थिक   हानी देण्यास सज्ज आहे. मंगळ  अजूनही  नुकसान  दाखवत आहे. दिवस नेहमी सारखाच पार पडेल. कन्या आज राशी च्या लाभ स्थानात चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून भागीदारी व संतती साठी शुभ फळ देईल. अकस्मात लाभ किंवा त्यासाठी संधी निर्माण होईल.परदेशी  जाण्याची  संधी मिळेल. आनंद देणारा दिवस आहे. तुला आज दिवस थोडा कष्ट देणारा ठरेल .चंद्र आर्थिक ,शारीरिक हानी, दर्शवतो. गुरु कृपा असेल. चतुर्थातील शनि आईवडील  गृहसौख्य यासाठी त्रास देणाराआहे.  शुक्र शुभ. भाग्य साथ देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आज लाभ मिळवुन देणारा , मित्र मैत्रिणीशी गाठ घालून देणारा असा दिवस आहे. चतुर्थ गुरू, तृतीय शनि कुटुंबाकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल असे सुचवतो. संतती सुख चांगले मिळेल.  दिवस चांगला जाईल. धनु आज कार्यालयीन घडामोडी  फार वाढतील. शुक्र स्त्री वर्गा कडून लाभ दाखवत आहे. तुमचा प्रभाव वाढेल. कार्य सिद्धी होईल. साडेसातीचा प्रभाव हळूहळू कमी होईल. . दिवस शुभ. मकर दोन दिवस कष्टाचे, अशांत गेले असतील. आज एका भाग्य कारक दिवसासाठी तयार रहा. आर्थिक लाभ संभवतात. प्रगतीच्या काही संधी येतील. मुलांची चिंता कमी होईल. दिवस शुभ असून यश मिळेल. कुंभ आज षष्ठ चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकेल. चंद्र गुरू  षडाष्टक शुभ कार्यात अडथळे निर्माण करेल. संतती चिंता होईल. घरात थोडी अस्थिर आणि तणावपूर्ण स्थिती  होईल  जोडीदाराची काळजी घ्यावी. मध्यम दिवस. मीन आज छानसा दिवस  असून संतती साठी काही खरेदी कराल. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. धनु राशीतील सूर्य  नवीन नोकरी साठी अनुकूल आहेत. बोलणी करायला शुभ दिवस.. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या