• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या दोन राशींच्या व्यक्ती आज चमकणार; तुमच्यावर ग्रह प्रसन्न आहेत का पाहा

राशीभविष्य: या दोन राशींच्या व्यक्ती आज चमकणार; तुमच्यावर ग्रह प्रसन्न आहेत का पाहा

आज दिनांक 18 September2021. शनिवार आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी. आज चंद्र दुपारनंतर कुंभ राशीत प्रवेश करेल. तुमच्या राशीवर याचा काय परिणाम होणार?

  • Share this:
आज दिनांक 18 September2021. शनिवार आज भाद्रपद शुद्ध त्रयोदशी. आज चंद्र दुपारनंतर  कुंभ राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस अत्यंत शुभ असुन ग्रह तुमच्यावर प्रसन्न आहेत. आर्थिक, धार्मिक,सामाजिक पातळीवर तुम्ही चमकणार आहात. प्रसिद्धी मिळेल. दिवस उत्तम. मत्सरी लोकांना दूर ठेवा. वृषभ आज  कार्यालयीन  काम सुरळीत पार पडेल. जास्त श्रम पडले तरी यश मिळेल. घरांमधे काही जबाबदारी येईल. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. दिवस शुभ आहे. मिथुन राशीच्या भाग्य स्थानात चंद्र ,आध्यात्मिक उन्नती साठी मदत करतील. छोटे प्रवास संभवतात. मौल्यवान वस्तु प्राप्त होतील. संतती सुख चांगले. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस उत्तम. कर्क आज अष्टमात चंद्र  सखोल वाचन, अभ्यास इत्यादी मध्ये यश देतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. अचानक लाभ होईल. भावंडाची भेट होईल.  प्रकृती जपा. पोटाचे त्रास संभवतात. दिवस  मध्यम. सिंह या राशीच्या व्यक्तींना हा काळ मान मिळवून देणारा आहे. प्रतिष्ठा वाढेल. भावंड खुश राहतील. आर्थिक उलाढाली होतील. . नवीन व्यवसाय पूरक घटना घडतील. दिवस चांगला. कन्या कन्या राशीत प्रवेश केलेला रवि लिखाण वाचन  यात शुभ फळ देईल. बुद्धी चा उत्तम वापर करून यश मिळवा .सौंदर्य प्रसाधन खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला. तुला संतती कडुन शुभ वार्ता कळतील. भरभराटीचा दिवस आहे. मात्र कायद्याचे उल्लंघन करू नका. सामाजिक जबाबदाऱ्या जपून घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस बरा जाईल. वृश्चिक आज घरात होणार्‍या काही समारंभाची तयारी, आखणी कराल. त्यानिमित्त खरेदी होईल.कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजु ठीक राहील. दिवस चांगला जाईल. धनु छोटे प्रवास, गाठीभेटी, संवाद असा हा दिवस आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रम ठरतील. कुटुंब सुख मिळेल. आर्थिक बाजू जपा. काहींना भावंडाची साथ मिळेल. दिवस चांगला. मकर आज आर्थिक व्यवहार, अचानक धनलाभ असा दिवस आहे. मात्र प्रकृती बाबत काळजी घ्या. कुटुंब, वाणी आत्मविश्वास पूर्ण राहील. दिवस चांगला. कुंभ राशीतील  चंद्र सात्विक अनुभव देणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. अष्टमात  ग्रह सावधगिरीचा इशारा देताहेत  घरातील शांतता भंग होऊ नये म्हणून सजग रहा. कुठेही अनावश्यक खर्च टाळा. दिवस शुभ. मीन व्ययस्थानातील  चंद्र  प्रवास गाठी भेटी, त्यानिमित्ताने खर्च, देणेघेणे यासाठी उत्तम. प्रकृती जपा. आर्थिक बाजु ठीक राहील. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाही. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
First published: