• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: कर्क, सिंह राशीने आज खर्च जपून करा; एका राशीला मात्र आहे आर्थिक फायदा

राशीभविष्य: कर्क, सिंह राशीने आज खर्च जपून करा; एका राशीला मात्र आहे आर्थिक फायदा

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

आज दिनांक 18 नोव्हेंबर 2021,गुरुवार आज चंद्र मेष राशीतून भ्रमण करणार असुन मंगळ बुध तुला राशीत असेल. तुमच्या राशीवर याचा काय जाणवेल परिणाम?

  • Share this:
आज दिनांक 18 नोव्हेंबर 2021,गुरुवार आज चंद्र मेष राशीतून भ्रमण करणार असुन मंगळ बुध तुला राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे  भविष्य. मेष राशी स्थानात असलेला चंद्र , शुभ असुन पराक्रम, बुद्धिमत्ता, संभाषण कला ,यात वाढ करेल.  तुमच्या बुद्धी आणि वाणी चातुर्याने तुम्ही सगळ्यांना जिंकून घेणार आहात.आर्थिक दृष्ट्या दिवस शुभ आहे. वृषभ षष्ठ स्थानात असलेला   बुध व्यवसाय क्षेत्रात भरघोस मदत करील. कुटुंब सुख ,उच्च विचार व संभाषण चातुर्य यात वाढ होईल. राशीतील राहू व व्ययस्थानातील चंद्र आजही मानसिक ताण व  अस्वस्थता निर्माण करतील. दिवस   मध्यम जाईल. मिथुन आज पंचम स्थानात असलेल्या  बुधाची संतती ,शिक्षण यासंबंधी शुभ फळ देईल. घरांमधे समारंभ होईल. प्रकृती जपा. तुमचे बुद्धी चातुर्य कमालीचे वाढेल.  लाभ स्थानातील चंद्र शुभ फळ देणारा आहे.  दिवस ठीक आहे. कर्क चतुर्थ स्थानात  बुध  राजयोग करीत असून परदेश गमन ,वास्तु यासंबंधी  सर्व  कागदपत्रे,आणि प्रवास  यासाठी अतिशय उत्तम काळ आहे. नोकरी, व्यवसाय पूरक आहे. फक्त थोडे खर्चावर नियंत्रण ठेवावे.  लाभदायक दिवस. सिंह राशी च्या  तृतीय स्थानात येणारे  बुध  मंगळ शुभ फळ आणि उत्तम लाभ  देतील .मैत्रिणी  किंवा  बहिणी तुम्हाला  उत्तम सल्ला देऊन  फायदा करून देतील. शिक्षण, परीक्षा  याकरता शुभ  काल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगती  सुखावह राहील. खर्च बेताने करा. गुरु कृपेचा लाभ घ्या. कन्या राशी स्वामी बुध तुला राशीत ,अष्टमात चंद्र आहे. व्यावसायिक  व्यक्तींना  शुभ काळ आहे. नवीन संधी, हाती घेतलेल्या कामात यश, प्रमोशन, असा हा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. शुभ घटना घडतील. .दिवस  मध्यम . तुला आज राशीस्थानात  असलेले बुध मंगळ खर्चाचे नवीन मार्ग देतील.  शुक्र अचानक लाभ,परदेश प्रवास, उच्च शिक्षणात भरघोस यश   देईल. शुभ  दिवस  आहे. धर्मा बद्दल आस्था वाढेल. शुभ कार्य घडतील. वृश्चिक सध्या होणारे  बुधाचे  भ्रमण व्यय स्थानात आहे .वृश्चिक व्यक्तींना जाणवणारा त्रास संपून नवीन जोश येईल.सखोल अभ्यास सुरू होऊन यश मिळेल. गृह सजावट,आर्थिक घडामोडी  यांना प्राधान्य मिळेल.  षष्ठ चंद्र  मध्यम फळ  देईल. दिवस चांगला. धनु लाभ स्थानात  बुध  फार चांगले फळ देणार असून भागीदारी मध्ये सामंजस्य निर्माण करेल. करार यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. संतती सुख उत्तम. षष्ठ स्थानात असलेला राहू  शत्रू वर विजय मिळवून देईल. दिवस शुभ आहे. मकर राशीच्या दशमातील  मंगळ नोकरीत नवीन संधी, नातेवाईकांशी  भेट, त्यापासून काही त्रास असे फळ देतील. मुलाखतीतून यश मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. संतती चिंता कमी होईल. दिवस चांगला. कुंभ भाग्यात होणारा उच्च बुध ,सर्व तर्‍हेने शुभफल देणारा आहे  .आर्थिक प्राप्ती, संतती सुख  उत्तम मिळेल. आत्मविश्वास वाढेल. कार्य सिद्धी होईल. घराकडे लक्ष  द्यावे लागेल. शुभ दिवस. मीन अष्टम स्थानातील बुध मध्यम असुन ,जोडीदार, कुटुंब  ही तुमची प्राथमिकता राहणार.  नवीन वास्तूचे स्वप्न सत्यात येईल.प्रवास योग येतील. महत्त्वाचा फोन येईल. नोकरीसाठी फार बरा काळ नाही,  शांत रहा. दिवस चांगला जाईल. शुभम भवतु!!
First published: