मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: मिथुन राशीच्या व्यक्तींना आज होणार आर्थिक लाभ

राशीभविष्य: मिथुन राशीच्या व्यक्तींना आज होणार आर्थिक लाभ

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2021 बुधवार  तिथी  कार्तिक शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. सूर्य वृश्चिक राशीतून  भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2021 बुधवार तिथी कार्तिक शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. सूर्य वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2021 बुधवार तिथी कार्तिक शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी. सूर्य वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 17 नोव्हेंबर 2021 बुधवार  तिथी  कार्तिक शुक्ल त्रयोदशी/चतुर्दशी .आज चंद्र मेष राशीतून भ्रमण करेल. बुध मंगळाशी तुला राशीतून प्रतियोग करेल. सूर्य वृश्चिक राशीतून  भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

राशीत चंद्र मंगळ प्रतियोग असून दिवस नित्या प्रमाणे जाईल. प्रकृती संबंधी थोडी चिंता वाटेल. मुलांकडे जरा लक्ष द्या. तुमच्यावर लोकांची नजर राहील.  जोडीदाराच्या प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. दिवस बरा.

वृषभ

आज राशीच्या व्यय स्थानातील चंद्र भ्रमण मानसिक आणि आर्थिक ताण देईल . सूर्य सप्तम स्थानात जोडीदाराला शुभ आहे.   जास्तीची कामे गळ्यात पडतील . शांत रहा. दिवस मध्यम आहे.

मिथुन

राशीच्या लाभ स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून आर्थिक लाभ होतील. मित्र मैत्रिणींसोबत संवाद होईल. चतुर्थ शुक्राचे भ्रमण  घरासाठी लाभदायी . दिवस शुभ.

कर्क

राशीच्या पंचम स्थानातील सूर्य कुटुंबातील व्यक्ती, संतती सोबत बोलाचाली  होईल. आर्थिक घडामोडी होतील. प्रवासाची आखणी कराल.  ऑफिसमध्ये खूप  काम पडेल. शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. दिवस उत्तम.

सिंह

आज भाग्य तुमची साथ देणार आहे.परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रकृती जपा. उष्णतेचे विकार त्रास देतील.  पंचम  शुक्र संततीअणि शिक्षणासाठी शुभ.  दिवस  बरा जाईल  .

कन्या

आज अष्टमात चंद्र  असून खूप दगदग होणार असे वाटते आहे. कुटुंब स्थानात मंगळ बुध मन   उद्विग्न ठेवेल.  तृतीय स्थानात सूर्य  प्रवास योग देईल. आज नोकरी व्यवसाय उत्तम राहील. दिवस मध्यम.

तुला

आज दिवस एकत्र फिरणे, खरेदी, समारंभाचे आयोजन करण्यात जाणार आहे. अध्यात्मिक साधना फलद्रुप होईल. धार्मिक कार्य घडेल.राशीतील सूर्य  अधिकारी व्यक्तीशी ओळख करून देईल. दिवस शुभ.

वृश्चिक

आज शरीर थकलेले, अणि मन संभ्रमात राहील आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक येणारे खर्च त्रास देतील.  शुक्र हातून कलाकृती निर्माण करेल. प्रकृती कडे लक्ष द्या.  दिवस बरा आहे.

धनू

पंचमात चंद्र,गुरू कृपेचा लाभ  होईल.धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल  संततीसाठी वेळ काढा. आर्थिक स्थिती ठीक राहील. भाग्य साथ देणार आहे. दिवस आनंदात घालवा.

मकर

आज  चतुर्थ चंद्र घरातील विशेष जबाबदारी पार पाडा असे सुचवतो आहे. जास्तीचे काम, ऑफिसमध्ये अचानक काम येईल. लाभ स्थानातील  सूर्य  अधिकार बहाल करेल. गृहसौख्य उत्तम राहील. दिवस चांगला.

कुंभ

आज लाभ स्थानातील शुक्र  शुभ असुन काही उत्तम लाभ मिळवुन देईल. आज प्रवास योग  येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने  तुम्ही अडचणी आल्या तरी सामना कराल. एकूण दिवस मध्यम.

मीन

आर्थिक बाजु उत्तम राहील. प्राप्तीचा दिवस आहे. त्यासाठी काही प्रयत्‍न करा. कुटुंबासाठी खर्च करायला तुम्ही तयार असाल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस शुभ.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya