• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: या राशीने जोडीदाराला वेळ द्यावा; पाहा तुमच्या राशीत काय?

राशीभविष्य: या राशीने जोडीदाराला वेळ द्यावा; पाहा तुमच्या राशीत काय?

आज दिनांक 17 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण नवमी. आज मंगला गौरी पूजन. पाहा 12 राशींचं ग्रहमान आणि भविष्य

  • Share this:
आज दिनांक 17 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण नवमी. आज  मंगला गौरी पूजन. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष हळूहळू तणाव कमी होईल.पंचमात ग्रह  आहेत संतती ला प्राधान्य द्यावे लागेल. अध्ययन, ईश्वर उपासना करावी, दिवस सामान्य आहे. वृषभ आज दिवस अनुकूल असून नित्य कर्म करण्यात यश देईल. काही विशेष पूजा इत्यादी घडेल. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ. मिथुन आज जाणवणारा आळस अणि थकवा आता कमी होणार आहे. दिवस सर्व सामान्य पणे व्यतीत होईल  .शनि उपासना करावी. कर्क आर्थिक लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. मुलांच्या बाबतीत काही  समाचार मिळतील. कुटुंबाला प्राथमिकता राहील. दिवस चांगला. सिंह राशीतील ग्रह काहीतरी घडामोडी  सुरू ठेवतील. जोडीदारासाठी शुभ काळ असून नवीन कार्य ठरतील. दिवस चांगला जाईल. कन्या घरात नवीन खर्च उभे राहतील. मंगळाचा जप करावा. व दान करावे. प्रकृती कडे लक्ष असू द्यावे. काही मोठ्या कार्यक्रमाची तयारी कराल. दिवस मध्यम. तुला आर्थिक व्यवहार जपून करा. प्राप्तीचे मार्ग मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा दिवस आहे. कुटुंब सुख उत्तम राहील. दिवस चांगला जाईल. वृश्चिक ज्येष्ठा नक्षत्रातला चंद्र प्रकृतीचे त्रास दाखवित आहे. स्वभाव हट्टी होईल. आपले तेच खरे असे करू नका. दिवस  अनुकूलता  वाढवणारा आहे. धनु आज खर्च, आणि दगदग होणार आहे. पण तुम्ही सांभाळून घेणार आहात. दिवस सामान्य असून रोजची कामे पार पडावीत. आर्थिक बाबी सांभाळून करा. मकर आज दिवस अनुकूल असून नैमित्तिक कामाशिवाय ईश्वरी उपासना करावी. मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. धार्मिक कार्य घडेल. दिवस शुभ. कुंभ आज घर अणि ऑफिस मध्ये समन्वय साधावा लागेल. त्यासाठी जास्तीची काम करण्याचा प्रयत्न कराल. भाग्यात सूर्य मंगळ तीव्र धर्म निष्ठा देईल. दिवस उत्तम जाईल. मीन आज दिवस भाग्यशाली असून संध्याकाळ पर्यंत काम उरकून घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खाण्या पिण्याचे बंधन पाळा. आरोग्य थोडे संभाळावे. दिवस चांगला. शुभम भवतु!!
First published: