Home /News /astrology /

राशीभविष्य: या राशीतला गुरू प्रगतीला साहाय्य करणार; दिवस एकूण बडबडीचा

राशीभविष्य: या राशीतला गुरू प्रगतीला साहाय्य करणार; दिवस एकूण बडबडीचा

आज गुरुवार दिनांक 16 september 2021. दशमी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आणि त्यानंतर एकादशी सुरू होईल.

आज गुरुवार दिनांक 16 september 2021 तिथी दशमी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत आणि त्यानंतर एकादशी. चंद्र आज सकाळी  10.30 नंतर  मकर  राशीत प्रवेश करेल. पाहू या आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र दशम स्थानात शनि आणि गुरू सोबत असेल. चंद्र शनि योग नकारात्मक मानसिकता वाढवेल. कार्यक्षेत्रात काहीसा तणाव असेल.फार काम पडेल .घरात  गडबड राहील. जास्त श्रम टाळा. दिवस शांततेत घालवा. वृषभ आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती, गुरुकृपा आणि शुभ घटनांचे राहील. आर्थिक बाजु चांगली राहील.भाग्य साथ देईल. दिवस एकूण गडबडीत जाईल. छोटे मोठे समारंभ होतील. मिथुन आज अष्टमात चंद्र शनि अणि गुरू विचित्र मानसिक अवस्था करेल. मन कुठेही रमणार नाही  शारीरिक व्याधी डोक वर काढतील. आर्थिक परिस्थिती मात्र चांगली राहील. संतती सुख चांगले. दिवस मध्यम आहे. कर्क आज चंद्र शनि सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी  विशेष अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. खर्च जपून करा. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्य ठरेल  दिवस शुभ. सिंह धन  कुटुंब वाणी स्थानात मंगळ  सूर्य तुम्हाला तेजस्वी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व  बहाल करेल. मात्र खर्च आणि मिळकत याची गडबड होऊ देऊ नका. कोणालाही कठोर बोलू नका. दिवस मध्यम आहे. कन्या आज संतती साठी थोडी  चिंता वाटेल. प्रकृती कडे लक्ष द्या. विशेष करून डोळ्यांची काळजी घ्या.  शुक्र कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा. दिवस मध्यम जाईल. तुला आज राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र शनि गुरू कार्यक्षेत्र आणि घर दोन्हीकडे  अडचणी निर्माण करतील. जास्तीचा ताण पडेल. शुक्र शुभ फळ देईल. गुरु कृपेचा लाभ घ्या. चिंता करू नका. दिवस बरा. वृश्चिक आज दिवसभर  थोडा ताण जाणवेल  प्रकृती शिथिल राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती सुख चांगले. घरात खूप काम पडेल. प्रवास योग येतील. जपून असा. घरांमधे सुखद घटना घडेल. धनु आर्थिक भरभराट, अडकलेला पैसा मिळणे, सरकार कडून लाभ असा हा दिवस आहे. त्यासाठी थोडा प्रयत्‍न केला पाहिजे. कायदे पाळा. पोटाचे त्रास वाढतील.  बोलणे जपून. दिवस ठीक आहे. मकर आज राशीतील चंद्र शनि  गुरू मन थोडे नाराज ठेवतील. भरभराटीचा काळ आहे. वाहन जपून चालवा. भाग्यशाली  रास. प्रवास एकट्याने करू नका. दिवस बरा जाईल. कुंभ आज व्यय स्थानातील चंद्र शनि  गुरू परदेशा संबंधी काही बातमी देतील. प्रकृती जरा शिथिल राहील. आर्थिक बाजू ठीक आहे. व्यवसायात अचानक नवीन संधी मिळतील. दिवस मध्यम जाईल. मीन आज दिवस मित्र मैत्रिणींकडून लाभ होण्याचा संभव आहे. व्यय स्थानात गुरू धार्मिक कारणांवर खर्च होईल .काही नवीन ओळखी होतील. पैसा  अतोनात खर्च होईल. जोडीदार आनंदी आहे. नाव लौकिक मिळेल. दिवस शुभ
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या