आज मंगळवार दिनांक 16 नोव्हेंबर 2021.कार्तिक शुक्ल द्वादशी /त्रयोदशी. आज चंद्र रेवती नक्षत्रातून भ्रमण करेल. आज सूर्य वृश्चिकेत, मंगळाच्या राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तो केतू समवेत ग्रहण योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
राशीच्या अष्टमात प्रवेश करणारे सुर्य केतू फारसे अनुकूल नाहीत .पोटाचे विकार त्रास देतील. आत्मविश्वास कमी होईल. व्ययस्थ चंद्र मानसिक हुरहुर लावेल. जोडीदाराची चिंता वाटेल. दिवस मध्यम.
वृषभ
रवि सप्तम स्थानात केतू सोबत येत आहे. व्यावसायिक अणि वैवाहिक जीवनात जपून रहा. कुठेही अनावश्यक बोलू नका. दुराग्रह टाळा. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस ठीक आहे.
मिथुन
राशीच्या षष्ठ स्थानात केतू अणि रवि.काही महत्त्वाच्या तपासण्या करणे गरजेचे असेल तर करून घ्या. शत्रू किंवा मत्सरी लोक मानसिक त्रास देतील. अष्टमात गुरू शेवटचे काही दिवस आहे. त्यानंतर भाग्य अनुकूल होईल दिवस कामात व्यस्त असा जाईल.
कर्क
आज रवि केतू राशीच्या पंचम स्थानात येत आहे. शैक्षणिक, सामाजिक पातळीवर तुम्ही अग्रेसर राहाल. काही नवीन विद्या शिकण्यास अनुकूल वेळ.चंद्र आज अनुकूल आहे. भाग्यशाली दिवस.
सिंह
आज राशी स्वामी रवि केतू सोबत वृश्चिक राशीत येणार आहे. गृह सौख्याच्या पर्वाची सुरवात होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. अष्टमात चंद्र मानसिक ताण दर्शवतो.
कन्या
तृतीय स्थानात रवि केतू भावंडांना फारसे अनुकूल नाही. मात्र धैर्य, पराक्रमाची वाढ होईल. स्वभाव तेजस्वी होईल. जलराशी वृश्चिकेत रवि सर्दी सारखे विकार देईल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस अनुकूल.
तुला
आज रवि केतू धनस्थानात प्रवेश करणार असून धन कुटुंब वाणी या संबंधी काही समस्या निर्माण होतील. कठोर बोलणे टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात. षष्ठ चंद्र आज शारीरिक त्रास दर्शवतो.
वृश्चिक
राशीत प्रवेश करणार सूर्य केतू स्वभाव आक्रमक करेल. चंद्र पोटा संबंधी काही समस्या असेल तर काळजी घ्या असे सुचवीत आहे. काहीतरी चिंता सतावू शकते .दिवस शांततेत घालवा.
धनु
व्यय स्थानात सूर्य केतू परदेश गमन, त्यासंबंधी तयारी यासाठी प्रयत्न सुरू करा असे सुचवित आहे. काही आवश्यक कागदपत्रे तयार करा. घरात काही जास्तीचे काम निघेल. दिवस चांगला.
मकर
आज सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश मकर व्यक्तींना अनुकूल आहे. कामाचा व्याप वाढेल. मात्र लाभ होतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. प्रवास योग, भावंडांची भेट संभवते. दिवस अनुकूल.
कुंभ
राशीच्या कर्म स्थानात येणारा रवि महत्त्वाचा घडामोडी करेल. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर होईल. काही नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम.
मीन
आज राशीच्या भाग्य स्थानात येणारा सूर्य शुभ फळ देईल. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. धार्मिक कार्य घडेल.लोन किंवा पैश्याची देवाणघेवाण जरा जपून करा. राशीतील चंद्र वैवाहिक जीवनात गोडी वाढवेल. दिवस शुभ.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.