• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: आजचा दिवस दगदगीचा; या 3 राशींनी सांभाळा

राशीभविष्य: आजचा दिवस दगदगीचा; या 3 राशींनी सांभाळा

आज दिनांक 15 September 2021.वार बुधवार. चंद्र धनु राशीत असेल. मेष, वृश्चिक, मकर, मीन राशीच्या लोकांनी आजचं भविष्य आधी वाचा.

  • Share this:
आज दिनांक 15 September 2021.वार बुधवार. चंद्र धनु राशीत असेल. गणरायाला वंदन करून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज  मेष राशी भाग्यवंत ठरेल. काही दिवस मानसिक ताण जाणवत असेल  तर तो आता कमी होईल. पूजेत मन रमवा. घरात अचानक  बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी  कष्ट कराल. दिवस  शुभ. वृषभ थोडे जपुन रहा  असा आजचा दिवस  सुचवतो आहे. अष्टमात चंद्र  भ्रमण  मानसिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील  राहू संभ्रमात पाडतील. कामाच्या ठिकाणी जपून वागा. दिवस  मध्यम आहे. मिथुन पंचम स्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र  आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत. आर्थिक नियोजन करण्याचे विचार येतील. नुकसान  होणार नाही हे बघा. जोडीदारा सोबत  दिवस  आनंदाने व्यतीत करा. कर्क राशी च्या  तृतीय स्थानातील मंगळ चंद्राशी केन्द्र योग करीत आहे. जपुन रहा.  प्रकृती सांभाळा. अति कामाचा ताण घेऊ नका.  ग्रहस्थिती फारशी  अनुकूल नाही. पण लौकरच  ठीक होईल .मारुतीची उपासना करणे योग्य. सिंह या राशीच्या व्यक्ती  आज आनंदी  असतील. नाव लौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. धन स्थानातील  मंगळ नाहक खर्च किंवा  चैनी कडे कल दाखवत आहेत. तिकडे लक्ष असू द्या. दिवस  चांगला . कन्या आज सगळा वेळ  घरासाठी  काही विशेष काम करण्यात जाईल. आर्थिक लाभ  होतील. एकूण दिवस चांगला आहे.पण मुलांशी  वाद नको. त्यांच्या  प्रकृतीची  काळजी घ्यावी लागेल.  दिवस चांगला  जाईल. तुला छोटे प्रवास, त्याची तयारी, किंवा आखणी करण्यात आजचा  दिवस घालवाल. काही महत्त्वाचा  संवाद आज घडू शकतो. फोन ईमेल, याद्वारे  जन संपर्क घडेल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी  घ्या. दिवस शुभ. वृश्चिक आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान  यात आज  वाढ होईल. खरेदीचे  मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी  काही वस्तूंची खरेदी  कराल.. थोडक्यात आणि सौम्य  बोला. शुभ दिवस. धनु राशीतून होणारे  चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल.  दशमातील मंगळ शुभ  आहे, प्रकृतीच्या  किरकोळ  तक्रारी कडे लक्ष द्या.अति खर्च, प्रवास नको. आर्थिक  स्थिती  ठीक राहील. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला. मकर आज दिवस  फारसा  अनुकूल नाही.  राशीतील शनी, व्यय स्थानातील चंद्र  व पंचमात राहू, सांभाळून रहा असे  सुचवत आहे. खर्च सांभाळुन करा. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या साठी काही निर्णय  घ्यायचे असतील  तर घ्या .दिवस  मध्यम आहे. कुंभ दिवस लाभ मिळवून देणारा  आहे. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल.  मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही  खर्च ही होईल. धार्मिक कार्या मध्ये मन रमेल .नियमाने उपासना करा. मीन नोकरी व्यवसायात आज फार दगदग होणार  आहे. मंगळ  कोणी नवीन व्यक्तीची  भेट दर्शवत आहे. दिवस भर  कामाचा ताण राहील. धार्मिक बाबी  किंवा पुजा यासाठी खर्च  होईल. त्याची तयारी कराल. दिवस  चांगला  आहे. शुभम भवतु!!
First published: