Home /News /astrology /

राशीभविष्य: वृषभ राशीला अचानक धनलाभ; सिंह, मकरेसाठी गाठीभेटींचा दिवस

राशीभविष्य: वृषभ राशीला अचानक धनलाभ; सिंह, मकरेसाठी गाठीभेटींचा दिवस

आज दिनांक 15 जानेवारी 2022. वार शनिवार. तिथी पौष शुद्ध त्रयोदशी. 3 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे.

आज दिनांक 15 जानेवारी 2022. वार शनिवार. तिथी पौष शुद्ध त्रयोदशी .आज चंद्र दिवसभर मिथुन राशीतून भ्रमण  करेल .पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतात. रखडलेले काम मार्गी लागेल.  रवि दशमात शनि सोबत  स्थित असून जिद्द, चिकाटी वाढवेल. वडिलांचे आरोग्य सांभाळा. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला आहे. वृषभ अचानक धनलाभ होईल . कामात रुची वाढवणारा काळ आहे. भाग्य स्थानातील सूर्य  ,घरात धार्मिक कार्य  घडतील. घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. खर्च बेताने करा. दिवस  शुभ. मिथुन राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे, त्यामुळे मानसिक स्थैर्य   मिळेल आणि आध्यात्मिक प्रगती होईल. भावंडाची गाठभेट होईल  वाद नको. दिवस उत्तम जाईल. कर्क व्यय स्थानातील चंद्र  आज प्रकृती थोडी नाजूक ठेवेल. सर्दी पडसे इत्यादी तक्रारी असतील. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. खर्च होईल. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल. दिवस मध्यम जाईल. सिंह लाभ स्थानातील  चंद्र मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. प्रवास योग येतील. घरांमधे महत्त्वाचा बदल  होईल. नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस शुभ आहे. कन्या राशी च्या चतुर्थ स्थानातील शुक्र बुद्धी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल.   घरात खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सजावट , कपडे ,दागिने यावर खर्च होणार आहे. दिवस चांगला जाईल. तुला भाग्य स्थानातील चंद्र शुभ असून आज काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आरोग्य ठीक असेल. मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम. वृश्चिक आज  प्रकृती थोडी सांभाळा. अष्टमात चंद्र  मानसिक अणि शारीरिक त्रास दाखवत आहे. योग्य ती काळजी घ्या. शुभ काळ येणारच आहे. दिवस मध्यम. धनु वैवाहिक जीवनात काही आनंदाचे प्रसंग येतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्यात यावेत. प्रकृती सांभाळा.  कार्य क्षेत्रात शुक्र शुभ फळ देणारा ठरेल. दिवस  शुभ आहे. मकर षष्ठ चंद्र आज नातेवाईक भेट सुचवतो आहे. लाभात मंगळ आहे  .ऑफिस मध्ये  सतर्क रहा. कुठलेही वाद नको. आर्थिक निर्णय उद्यावर  ढकला. हाताखालच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. दिवस चांगला. कुंभ आज तुमची अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. संतती  हट्टी  पणे वागेल. जोडीदाराला सांभाळून घ्या. पण जमेल तितकी काम उरकून घ्या. दिवस शुभ. मीन आज नवीन परिचय  होतील.  खर्च खूप होतील..घरांमधे काही जास्तीची काम आटपून घ्याल.  महत्त्वाचा पत्र व्यवहार होईल.  घराकडे लक्ष देण्याची गरज आहे.  दिवस चांगला जाईल. शुभम भवतु !!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या