आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध सप्तमी. आज रविवार..चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करीत आहे. सिंह राशीत मंगळ बुधा सोबत असेल. . तिथून तो गुरूशी प्रतियोग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज तुम्हाला मनोधैर्य राखून ठेवायचे आहे. पंचम स्थानात प्रवेश केलेले मंगळ बुध मुलां संबंधी काही चिंता उत्पन्न करतील. पण गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करील. धार्मिक कार्य घडेल. दिवस बरा जाईल.
वृषभ
चतुर्थ स्थानात मंगळ बुध घर अणि वाहन यासंबंधी चांगल्या घटना घडतील. काही नवीन वास्तु संबंधी निर्णय होईल.वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदार सहकार्य करेल. दिवस चांगला जाईल.
मिथुन
आज चंद्र दिवसभर वृश्चिकेत असणार आहे.षष्ठ चंद्र आराम करावा असे सुचवत आहे. तृतीय स्थानात प्रवेश करणारा मंगळ बुध भावंडाची काळजी लागेल. प्रवास ठरतील. तुमचा स्वभाव कडक होईल. दिवस शुभ.
कर्क
धन स्थानात मंगळ यापुढील काही दिवस खर्चात अचानक वाढ करेल. कुटुंबासाठी काहीतरी करावेसे वाटेल. शुक्र आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. प्रवास होतील. मुलांची काळजी घ्या. दिवस शुभ.
सिंह
राशीत आलेला मंगळ सिंह व्यक्ती ना तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. कन्या शुक्र आकर्षण निर्माण करतो. .तेव्हा जरा जपून रहावे .अचानक आयुष्यात कोणीतरी येण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस चांगला.
कन्या
आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वात आणखी भर पडेल. समाजासाठी काही करण्याची इच्छा होईल. व्यय स्थानात आलेला मंगळ आता जपून रहा असे संकेत देत आहे. प्रवासाचे योग. दिवस मध्यम.
तुला
आज मन पूर्णपणे कुठेतरी गुंतून राहील. संतती, मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल . लाभ होतील. कुठूनतरी पैसा मिळेल. आर्थिक स्थिती बाबत काळजी घ्यावी असे वाटते . दिवस शुभ आहे.
वृश्चिक
राशीतील चंद्र अनेक ठिकाणी यश देईल. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. जुने संबंध फायदा करून देतील. प्रकृती ठीक राहील .आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस चांगला आहे.
धनु
भाग्यात मंगळ बुध वडिलांकरता शुभ आहे. पण त्यांच्याशी वाद करू नका. प्रकृती ठीक राहील. आर्थिक बाजू बरी राहील. व्ययस्थानातील चंद्र मानसिक दृष्ट्या कठीण. दिवस मध्यम जाईल.
मकर
अष्टमात प्रवेश केलेले मंगळ बुध,पोटाचे किंवा तत्सम विकार डोके वर काढतील. प्रवास संभवतात. मात्र काळजीपूर्वक रहावे. वाहनापासून जपावे. गुरु कृपा आहे. दिवस चांगला आहे.
कुंभ
आज मंगळ सप्तमात बुधाच्या सोबत आलेला असून येथे गुरूचा प्रभाव आहे. जोडीदार खुशराहील. कार्यक्षेत्रातील अडचणी बद्दल चौकशी करावी. मंगळ अडचण निर्माण करेल. दिवस चांगला जाईल.
मीन
आज पासून काही दिवस प्रकृतीची काळजी घ्या रक्तदाब, मधुमेह असेल तर तपासणी करून घ्यावी. मंगळाची उपासना करावी. आज चंद्र भाग्यात शुभ फळ देणारा ठरेल. शुभ दिवस.
शुभम भवतु!!
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.