• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • राशीभविष्य: मीन राशीच्या व्यक्तींना सांभाळा; आज होणार अतोनात खर्च

राशीभविष्य: मीन राशीच्या व्यक्तींना सांभाळा; आज होणार अतोनात खर्च

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

ज सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021. तिथी कार्तिक शुक्ल चतुर्थी. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल.

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2021 शनिवार तिथी कार्तिक शुक्ल दशमी. कुठल्या राशीला आजचा दिवस चांगला आणि काय काळजी घ्यायची?

 • Share this:
  आज दिनांक 13 नोव्हेंबर 2021 शनिवार  तिथी कार्तिक शुक्ल दशमी. जाणून घेऊया आजचे बारा राशींचे  भविष्य. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीतून राहील. मेष आज तुमच्या लाभ स्थानात होणारे चंद्र  भ्रमण आर्थिक लाभ घडवून देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम. वृषभ षष्ठ स्थानात मंगळ बुध रवि  अकस्मात खर्च, रोग, कर्ज, अणि शत्रूशी सामना करायला लावील. कार्यक्षेत्रातील अडचणी आज दूर होतील. राशी स्वामी शुक्र अष्टमात असून स्त्रियांनी काळजी घ्यावी असे सुचवीत आहे. मिथुन राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण अतिशय शुभ असून भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. प्रकृती जपा. अष्टमस्थ ग्रह बलवान आहेत .सप्तम शुक्र अनुकूल आहे, जोडीदारासाठी शुभ फळ देईल. दिवस शुभ. कर्क अष्टम चंद्राच्या प्रभावातून आजचा दिवस फार चांगला नाही. मानसिक अस्वास्थ्य, पोटाचे त्रास संभवतात. मात्र नोकरी पेशा व्यक्तींना शुभ फळ देईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम जाईल. सिंह राशीच्या सप्तम स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल असून दोघांनी मिळून जी काम उरकायची आहेत ती आज करून टाका. संतती कडुन शुभ वार्ता मिळतील. दिवस चांगला जाईल. कन्या धनस्थानात एकत्रित असलेले ग्रह कुटुंब वाणी, पैसा यावर प्रभाव टाकतील वाणी प्रखर, स्वभाव तापट होईल. हातून काही मोठे काम घडण्याची शक्यता आहे. आज दिवस मध्यम जाईल. तुला राशीतील सूर्य, मंगळ, रवि,  पंचमस्थ चंद्राशी नवपंचम योग करीत आहे.संतती साठी अत्यंत शुभ दिवस राहील  शैक्षणिक क्षेत्रात भरघोस मदत करतील. आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस शुभ. वृश्चिक राशी स्वामी मंगळ व्ययस्थानात बुध रवि सोबत, प्रकृती संबंधी तक्रारी निर्माण करतील. जास्तीचा खर्च होईल. परदेश गमन अधिक सुलभ होईल. घरांमधे काही जबाबदारी येईल. दिवस बरा जाईल. धनु तृतीय चंद्र प्रवास योग आणेल. तुम्हाला अनेक दिवस ज्यांना संपर्क करायचा आहे त्यांचा फोन येईल. बहीण भावंडांची भेट घडेल. राशीतील शुक्र आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. दिवस शुभ. मकर आज दिवस  आर्थिक भरभराट, कुटुंबाचे स्वास्थ्य, आणि एखाद्या विशिष्ट चिंतेतून मुक्तता असा आहे. व्यावसायिक निर्णय अचूक ठरल्याने  लाभ होईल. पण शुक्र व्ययस्थानात आहे, अधिक खर्च ,परदेशवारी संबंधी बोलणी होतील. दिवस शुभ. कुंभ राशीतून होणारे चंद्र भ्रमण शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भाग्यशाली  दिवस आहे. बहिण भावंड भेट देतील. प्रकृती जरा शिथिल राहील. दिवस उत्तम. मीन राशीच्या व्यय स्थानात चंद्र प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक स्थिती सांभाळा. अतोनात खर्च होईल. अष्टमात ग्रह सावधगिरीचा इशारा देताहेत. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
  First published: