मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: आजची मोक्षदा एकादशी कुणाला देणार विशेष फळ?

राशीभविष्य: आजची मोक्षदा एकादशी कुणाला देणार विशेष फळ?

आज दिनांक 14 डिसेंबर 2021 तिथी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. मोक्षदा एकादशी. आज बहुतेक राशींना शुभ दिवस आहे.

आज दिनांक 14 डिसेंबर 2021 तिथी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. मोक्षदा एकादशी. आज बहुतेक राशींना शुभ दिवस आहे.

आज दिनांक 14 डिसेंबर 2021 तिथी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. मोक्षदा एकादशी. आज बहुतेक राशींना शुभ दिवस आहे.

  आज दिनांक 14 डिसेंबर 2021 तिथी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी. मोक्षदा एकादशी. शुभ दिवस. मंगळवार. चंद्र दिवसभर मेष राशीतून भ्रमण करणार असून मंगळाशी षडाष्टक योग करीत आहे.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  मेष

  आज दिवस समाधानात जाईल. आर्थिक लाभ होणार आहेत.  आरोग्य ठीक राहील. घराकडे लक्ष द्यावे लागेल.समारंभाचे  संकेत. बौद्धिक पातळीवर यश मिळवून देणारा दिवस चांगला जाईल.

  वृषभ

  आज तुमचा दिवस  निवांत जाणार आहे. खर्च अचानक वाढतील. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. संतती कडून काही लाभ संभवतात. बौद्धिक प्रगती होईल. दिवस चांगला.

  मिथुन

  आज  अगदी निवांत दिवस घालवा. सध्या तुम्ही कामात  बिझी आहात, काही काम त्रासदायक ठरणार आहेत. भावंडाची काळजी  घ्या .प्रवास योग येतील. घरासाठी विशेष खरेदी कराल. दिवस शुभ आहे.

  कर्क

  आज तुम्ही घरातच बिझी राहणार आहात. ऑफिस मध्ये जबाबदारी, त्याचे नियोजन असा दिवस जाईल. आर्थिक घडामोडी घडतील.  दिवस शुभ.

  सिंह

  चतुर्थ मंगळ  उष्णतेचे विकार  देईल. पंचमातील  बुध  बौद्धिक लाभ देईल. स्वभाव जरा तापट होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य घडेल.. दिवस चांगला जाईल.

  कन्या

  आज तुम्हाला आराम करण्याची गरज भासेल. फार दगदग करू नका. प्रकृती सांभाळा. पोटाचे त्रास होतील. खर्च फार वाढणार आहे. पण अनपेक्षित लाभ ही होतील. दिवस मध्यम जाईल.

  तुला

  आज तुला राशीच्या व्यक्ती जोडीदाराला घेऊन फिरायला,जोडीने खरेदी करायला जातील . सूर्य कार्यक्षेत्रात मोठा अधिकार देईल. दिवस चांगला आहे.

  वृश्चिक

  प्रकृती सांभाळा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. आज कोणाशीही वाद नको. मात्र मंगळ लौकरच नवीन संधी उपलब्ध करून देईल. दिवस शुभ.

  धनु

  आज संतती साठी काही तरी काम करावं लागेल. त्यासाठी पैसा खर्च होईल. धार्मिक कार्य घडेल. किंवा प्लॅनिंग कराल. राशीतील  बुध वाणिज्य क्षेत्रात यश देईल. एकूण दिवस शुभ आहे.

  मकर

  आज तुम्ही घरातली जास्तीची काम आटपून घ्याल. काही विशेष खरेदी होईल. प्रकृती ठीक राहील. वाहन जपून चालवा.  राशीत शुक्र. आर्थिक गुंतवणूक करा. दिवस शुभ.

  कुंभ

  सुट्टीचे निमित्त साधून आज जवळपास मौजमजेचे बेत कराल. काही महत्त्वाचे फोन येतील. प्रकृती  जपा. भावंडाची भेट होईल. जोडीदाराचा मूड सांभाळा. दिवस चांगला जाईल.

  मीन

  आर्थिक, शारीरिक अणि मानसिक सर्व बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहे. व्यवसाय अचानक भरारी घेईल. थकलेले देणे मिळेल. प्रकृती साथ देईल. कुटुंब सुख भरपूर मिळेल. दिवस चांगला आहे.

  शुभम भवतु!!

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya