• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: महाअष्टमीचा दिवस कुठल्या राशींसाठी आहे शुभ? वाचा

राशीभविष्य: महाअष्टमीचा दिवस कुठल्या राशींसाठी आहे शुभ? वाचा

आज दिनांक 13ऑक्टोबर, बुधवार. आज महाअष्टमी/ नवमी. जगदंबेच्या आठव्या रूपाला महागौरी असे संबोधले जाते. आजचा दिवस कुठल्या राशींसाठी कसा असेल वाचा दैनंदिन राशीभविष्य...

  • Share this:
आज दिनांक 13ऑक्टोबर , बुधवार. आज महाअष्टमी/ नवमी. आज  अष्टमीचा उपवास केला जातो. नऊ दिवसातला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून आज  नवचंडी  हवन  केले जाते. कुमारिका पूजन करून आदी शक्ति जगदंबे ची अर्चना केली जाते. आज  नव दुर्गा मधल्या आठव्या रुपाचे पूजन केलं जाते. जगदंबेच्या आठव्या रूपाला महागौरी असे संबोधले जाते. ही श्वेत वर्ण, श्वेत वस्त्रा, चतुर्भुजा,  दिव्य स्वरुपा आहे. तिने हातात त्रिशूल, डमरू धरण केला आहे. अभयदात्रि ,वरदायनी माता महागौरी हिने शिव प्राप्तीसाठी घोर तपस्या केली. तिच्या आशीर्वादाने सर्व पापं नष्ट होतात. अणि भक्ताचं कल्याण होतं. आज चंद्र दिवसभर धनु राशीत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज  मेष राशी भाग्यवंत ठरेल. मानसिक ताण जाणवत असेल  तर तो आता कमी होईल. देवीच्या पूजेत मन रमवा. खर्च वाढतील. घरात अचानक  बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी  कष्ट कराल. दिवस  शुभ. वृषभ थोडे जपुन रहा  असा आजचा दिवस  सुचवतो आहे. अष्टमात चंद्र  भ्रमण  मानसिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील  राहू संभ्रमावस्था निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी जपुन वागा. . दिवस  मध्यम आहे. मिथुन षष्ठ स्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र  आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत. आर्थिक नियोजन करण्याचे विचार येतील. नुकसान  होणार नाही हे बघा. जोडीदारा सोबत  दिवस  आनंदाने व्यतीत करा. कर्क राशी च्या  तृतीय स्थानातील मंगळ चंद्राशी केन्द्र योग करीत आहे. जपून रहा.  प्रकृती सांभाळा. अति कामाचा ताण घेऊ नका.  ग्रहस्थिती फारशी  अनुकूल नाही. पण लौकरच  ठीक होईल . मारुतीची उपासना करणे योग्य. सिंह या राशीच्या व्यक्ती  आज आनंदी  असतील. नाव लौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. धन स्थानातील  मंगळ नाहक खर्च किंवा  चैनी कडे कल दाखवत आहेत.  तिकडे लक्ष असू द्या. दिवस  चांगला . कन्या आज सगळा वेळ  घरासाठी   जास्तीचे काम करण्यात जाईल. आर्थिक लाभ  होतील. एकूण दिवस चांगला आहे.पण आईशी वाद नको. त्यांच्या  प्रकृतीची  काळजी घ्यावी लागेल.  दिवस चांगला  जाईल. तुला छोटे प्रवास, त्याची तयारी, किंवा आखणी करण्यात आजचा  दिवस घालवाल. काही महत्त्वाचा  संवाद आज घडू शकतो. फोन ईमेल, याद्वारे  जन संपर्क घडेल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी  घ्या. दिवस शुभ. वृश्चिक आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान  यात आज  वाढ होईल. खरेदीचे  मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी  काही वस्तूंची खरेदी  कराल.. थोडक्यात आणि सौम्य  बोला. शुभ दिवस. धनु राशीतून होणारे  चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल.  दशमातील मंगळ शुभ  आहे, प्रकृतीच्या  किरकोळ  तक्रारी कडे लक्ष द्या.अति खर्च, प्रवास नको. आर्थिक  स्थिती  ठीक राहील. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला. मकर आज दिवस  फारसा  अनुकूल नाही.  राशीतील शनी, व्यय स्थानातील चंद्र  व पंचमात राहू  , सांभाळून रहा असे  सुचवत आहे. खर्च सांभाळुन करा. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्या साठी काही निर्णय  घ्यायचे असतील  तर घ्या .दिवस  मध्यम आहे. कुंभ दिवस लाभ मिळवुन देणारा  आहे. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल.  मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही  खर्च ही होईल. धार्मिक कार्या मध्ये मन रमेल .नियमाने उपासना करा. मीन नौकरी व्यवसायात आज फार दगदग होणार  आहे. मंगळ   कोणी नवीन व्यक्तीची  भेट दर्शवत आहे. दिवस भर  कामाचा ताण राहील. धार्मिक बाबी  किंवा पुजा यासाठी खर्च  होईल. त्याची तयारी कराल. दिवस  चांगला  आहे. शुभम भवतु!!
First published: