मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: या राशींना आज मिळणार आर्थिक लाभ

राशीभविष्य: या राशींना आज मिळणार आर्थिक लाभ

आज शनिवार दिनांक14 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध षष्ठी. दोन राशींचं ग्रहमान आर्थिक लाभ दर्शवणारं आहे. पाहा तुमचं आजचं भविष्य...

आज शनिवार दिनांक14 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध षष्ठी. दोन राशींचं ग्रहमान आर्थिक लाभ दर्शवणारं आहे. पाहा तुमचं आजचं भविष्य...

आज शनिवार दिनांक14 ऑगस्ट 2021 तिथी श्रावण शुद्ध षष्ठी. दोन राशींचं ग्रहमान आर्थिक लाभ दर्शवणारं आहे. पाहा तुमचं आजचं भविष्य...

  आज शनिवार दिनांक14 ऑगस्ट  2021 तिथी श्रावण शुद्ध षष्ठी. चंद्र आज  तुला राशीत असेल. आजचे बारा राशींचे भविष्य बघू या.

  मेष

  जोडीदारासाठी  काही करण्याचा दिवस  आहे. षष्ठ शुक्र रोग पिडा देईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. तुमच्या  वाणीचा प्रभाव सगळ्यांवर पडेल. दिवस शुभ.

  वृषभ

  आज दिवस नेहमी सारखाच जाईल. जास्त दगदग करू नका. घरा साठी काही नावीन्य पूर्ण वस्तु खरेदी होतील. आर्थिक स्थिती ठीक. सौंदर्य प्रसाधन, उंची वस्त्र यांची खरेदी  होईल. दिवस  चांगला आहे.

  मिथुन

  आज काही नवीन वाचन, अभ्यास इत्यादी मध्ये वेळ जाईल. सिंह राशीतील बुध अणि पंचमातील चंद्र,उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ आहे. दिवस शुभ आहे.

  कर्क

  चतुर्थ चंद्र गुरूशी  शुभ योग करीत आहे. नोकरी आणि घर  दोन्हीकडे  लक्ष द्यावे लागेल. त्याची चांगली फळे  मिळतील. घरात काही विशेष पूजा करण्याचे योग. दिवस उत्तम.

  सिंह

  तृतीय चंद्र  ,आज छोटे मोठे  प्रवास, मौजमजेसाठी खर्च ,किंवा  बहिण भावाशी संवाद असे योग दाखवित आहे.  भाग्य स्थानाचा स्वामी  मंगळ राशीत असुन शुभ आहे. दिवस  चांगला आहे.

  कन्या

  आर्थिक लाभ, ओघवती भाषा, अणि कुटुंब सुख असा हा उत्तम दिवस आहे. त्यासाठी थोडा वेळ कुटुंबातील व्यक्तींना द्यावा लागेल. लाभ होतील. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस शुभ आहे.

  तुला

  आज तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही अधिकार बहाल करण्यास वरीष्ठ राजी असतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.  दिवस चांगला जाईल.

  वृश्चिक

  आज चंद्र  शारीरिक थकवा किंवा जास्ती काम, खर्च दाखवत आहे. भाग्य स्थानातील सूर्य अधिकारी व्यक्तीशी ओळख करून देईल. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. दिवस मध्यम.

  धनु

  आज दिवस लाभदायक आहे.  संतती सुख, छोटे प्रवास, उच्च शिक्षणात यश असा हा दिवस  शांततेत पार पडेल. आर्थिक लाभ होतील. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. दिवस चांगला आहे.

  मकर

  कार्यक्षेत्रात नवीन घडामोडी व्हायला सुरू होतील. अत्यंत सावध राहा. बुद्धीचा कारक बुध अष्टम स्थानात आहे. शत्रूवर नजर ठेवून रहा. संतती संबंधी काळजी कमी होईल. दिवस शुभ.

  कुंभ

  आज तुमच्या समोर भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण नवीन संधी, प्रवास, काही समारंभ असे शुभ फळ घेऊन येईल. शुक्र व्यावसायिक  लाभ मिळवून देणार  आहे. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम

  मीन

  आज अगदी दगदग ना करता कामावर लक्ष देऊन दिवस पार करायचा आहे. जास्तीचे काम तुम्हाला बिझी ठेवेल आणि थकवा जाणवेल .आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती कडे जरा लक्ष द्या. दिवस संथ आहे.

  शुभम भवतु!!

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya