मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: नवरात्रातल्या सातव्या माळेला या 2 राशींना मिळणार भाग्याची साथ

राशीभविष्य: नवरात्रातल्या सातव्या माळेला या 2 राशींना मिळणार भाग्याची साथ

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आज मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर 2021.आज अश्विन शुद्ध सप्तमी . नवरात्रातील सातवी माळ. आज माता कालरात्रीचं पूजन केलं जातं. या देवीविषयी जाणून घ्या आणि सोबत वाचा आजचं दैनंदिन राशीभविष्य...

आज मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर 2021.आज अश्विन शुद्ध सप्तमी . नवरात्रातील सातवी माळ. आज माता कालरात्रीचं पूजन केलं जातं. कालरात्री  जिचा वर्ण रात्रीसारखाच काळा आहे  जी त्रिनेत्रा आहे, अठरा हात आहेत, जीभ रक्त वर्ण आणि बाहेर निघालेली आहे.डोळे लाल आणि विस्फारले आहेत  जिने हातात अस्त्र शस्त्र सहित दैत्याचे शीर घेतले आहे. खापर धारि ,गळ्यात  नररुंडाची  माळ घातली आहे अश्या माता काल रात्रीला त्रिवार नमन. रणांगणात दैत्यांचा  नाश करणारी माता  क्रोधाने संतप्त आहे. तरीदेखील ती ज्ञान आणि वैराग्याची मुर्ती आहे. मातृरुपिणी आहे. जगन्माता सर्वांचे कल्याण करो हीच प्रार्थना.

आज चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण सुखद आणि हवे हवेसे अनुभव देईल. तुमचा मान सन्मान वाढेल.  घरात काही विशेष  बोलणी सुरू होतील. प्रकृती  चांगली राहील. दिवस उत्तम आहे.

वृषभ

आज वृषभ राशीच्या व्यक्ती साठी  दिवस ताण तणावाचा आहे. उगीच थकवा   जाणवेल. आर्थिक बाजू उत्तम असली तरी घरांमधे खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद  होतील. दिवस मध्यम  आहे.

मिथुन

आज दिवस व्यवसाय  आणि नोकरीसाठी उत्तम असून जोडीदाराची मदत मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील.  बुध घरासाठी खरेदीची कल्पना  आणेल .पण  घाईने निर्णय घेऊ नका. दिवस बरा जाईल.

कर्क

आज दिवस  संथ, अणि कंटाळवाणा असेल. खूप काम पडेल  पण मन रमणार नाही. आर्थिक बाजू ठीक आहे. अचानक मोठा खर्च येऊ शकतो. गुरूची उपासना करावी. दिवस मध्यम.

सिंह

आज संतती साठी काही तरी  छान करावे लागेल. त्यासाठी खर्च ही होईल.  धार्मिक गोष्टी मध्ये वेळ घालवाल. प्रकृती जपा. काहींना अचानक धनलाभ होईल. दिवस शुभ.

कन्या

आज सगळा वेळ घरासाठी द्यावा लागेल. त्यात  साफसफाई, काही नवीन सजावट  कराल. आर्थिक बाजु जपा. जास्तीचे खर्च उभे राहतील. मंगळाचा जप करा. दिवस बरा जाईल.

तुला

आज छोटा प्रवास घडेल. व्यय स्थानातील बुध परदेशी जाण्याची नवीन संधी मिळवुन देईल. धैर्य आणि चिकाटी वाढवेल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे महत्व वाढेल .सूर्य मंगळ  नोकरीच्या ठिकाणी सांभाळून रहा  आणि काळजी घ्या असे सांगतो आहे.

वृश्चिक

आर्थिक लाभ संभवतात. बुद्धी चा वापर करून एखादे काम  तुमच्या हाताने  छान पार पडेल. कार्यक्षेत्रात तुमचा  प्रभाव वाढेल. नवीन नोकरीसाठी प्रयत्‍न केला तर यश मिळेल. प्रकृती जपा . दिवस उत्तम जाईल.

धनु

दशमात सूर्य मंगळ वडीलधारी व्यक्ती काही लाभ मिळवून देईल. धार्मिक कामात रुची वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या. काहींना भावंडाची साथ मिळेल. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस चांगला जाईल .

मकर

भाग्यात आलेला मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुटुंबात काही नवीन व्यक्तीचे आगमन होईल. मधल्या काळात बरेच सोसावे लागले. आता त्याची तीव्रता कमी होईल. गुरुकृपा राहील. दिवस शुभ

कुंभ

मार्गी गुरू  अणि लाभातील चंद्र  शुभ फळ देतील. जोडीदाराची काळजी घ्या. काही खर्च ही होईल. भागीदारीचे  निर्णय  चुकू शकतात. खर्च वाढेल. पण लाभ ही होतील. दिवस उत्तम जाईल.

मीन

आज चा दिवस हा गुरू सेवा करण्याचा आहे.  आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.त्यासाठी  सावध रहा. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे शत्रू फारसे टिकणार नाहीत. कार्यालयात जास्त काम पडेल .दिवस मध्यम जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya