• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: कन्या राशीच्या नोकरदारांना दिवस उत्तम; कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्याचा जोडीदार भेटणार

राशीभविष्य: कन्या राशीच्या नोकरदारांना दिवस उत्तम; कुंभ राशीच्या व्यक्तींना आयुष्याचा जोडीदार भेटणार

आज शुक्रवार. दिनांक 12 नोव्हेंबर 2021.तिथी कार्तिक शुक्ल अष्टमी (क्षय तिथी ). कुंभेच्या लग्नार्थींना आज भेटू शकतो आयुष्यभराचा जोडीदार, कन्येच्या नोकरदारांसाठी दिवस चांगला. वाचा तुमच्या भविष्यात काय..

  • Share this:
आज शुक्रवार. दिनांक 12 नोव्हेंबर 2021.तिथी कार्तिक शुक्ल अष्टमी (क्षय तिथी ). आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष चंद्राचे लाभ स्थानावरून भ्रमण लाभदायी ठरेल. भाग्य स्थानातील शुक्र नवी खरेदी करायला लावेल. प्रवास योग येतील. संतती चिंता कमी होईल. गुरू शनि शुभ योगाची फळे मिळतील. अध्यात्मिक गोष्टींकडे कल होईल. दिवस शुभ. वृषभ आज दिवस कार्यक्षेत्रात  नवीन संधी  घेऊन येणार आहे. या आठवड्यात मंगळाचे स्वामित्व तुमच्या  षष्ठ स्थानावर राहील  त्यादृष्टीने काळजी घ्या. आर्थिक नियोजन करा  खर्च जपून करा.  दिवस चांगला आहे  . मिथुन आज राशीच्या भाग्य स्थानातील  चंद्र अतिशय शुभ फळ देणारा ठरेल. प्रवास,  धार्मिक कार्य घडेल. महत्त्वाचा निर्णय होईल .कौटुंबिक जीवनात  काही आनंदाचे क्षण येतील. तुमच्या साठी आजचा दिवस शुभ आहे. कर्क काही कारणाने आज तुमचा दिवस कटकटीचा जाण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान  किंवा खर्च, शारीरिक त्रास संभवतात. मात्र नामजप, साधना करण्यासाठी फार शुभ दिवस आहे. सिंह चंद्राच्या प्रभाव क्षेत्रातून आजचा दिवस जोडीदाराला शुभ फळ देणारा ठरेल. व्यवसाय उद्योगात काही नवीन घटना घडतील. धनलाभ होईल. दिवस चांगला जाईल. कन्या आज दिवस पुन्हा गडबडीत जाईल. थकवा जाणवेल. पण षष्ठ स्थानातील  चंद्र नोकरदार व्यक्तींना उत्तम फळ देईल. आई कडील नातेवाईक भेटतील. किंवा संपर्क करतील. खर्च बेताने करा. दिवस शुभ. तुला पंचमात चंद्र  उत्तम संतती सुख देणार आहेत. आध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण, परीक्षा याकरता शुभ काल. तुमचा नाव लौकिक वाढेल. तृतीय शुक्र  कलाकारांना शुभ. दिवस उत्तम आहे. वृश्चिक घर आणि कुटुंबिय यांसाठी आजचा दिवस सत्कारणी लागेल. गुरू आणि चंद्र  शुभ असून घरासाठी उत्तम खरेदी होईल.  मंगळ  तुमच्या ऊर्जेचा व्यय करेल.  आर्थिक  दृष्ट्या शुभ दिवस. धनु तृतीय  चंद्र आणि  लाभातील मंगळ  शुभ संकेत देत आहेत. गुरुकृपा  होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख,  भावंडांना लाभ, मौजमजेसाठी  प्रवास असा हा दिवस शुभ फळ देईल. मकर आज द्वितीय स्थानातील  चंद्र अतिशय शुभ फळ देणारा असून आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दशमातील  रवि  मंगळ  कार्यक्षेत्रात उत्तम संधी, अधिकारी वर्गाची भेट घडवून देतील. दिवस शुभ आहे. कुंभ राशीतील  चंद्र सात्त्विक प्रवृत्ती वाढीस लागतील. गुरुकृपा राहील.आर्थिक लाभ होतील. नवीन काही सुरू करण्यास दिवस शुभ आहे.  आयुष्याचा जोडीदार  मिळण्याची शक्यता आहे. दिवस चांगला. मीन चंद्र बारावा आहे  काही कारणांसाठी उगीच भटकंती ,खर्च ,खरेदी ,व्यय असा हा दिवस बिझी जाईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तृतीय स्थानातील राहू वारंवार फिरती  दाखवत आहे.दिवस मध्यम. शुभम  भवतु!!
First published: