• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: वृषभ, मिथुन राशींसाठी आज उघडणार भाग्याचे दरवाजे

राशीभविष्य: वृषभ, मिथुन राशींसाठी आज उघडणार भाग्याचे दरवाजे

आज गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक शुद्ध सप्तमी.आज चंद्र मकर राशीत भ्रमण करीत आहे. वाचा आजचं भविष्य...

  • Share this:
आज  गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर  2021 तिथी कार्तिक शुद्ध सप्तमी.आज चंद्र मकर राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज घरांमधे  अनेक बदल होतील. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होऊन काम सुरळीत होईल. धार्मिक कार्य, घरगुती कार्यक्रम यात सहभाग घ्याल. आज दिवस शुभ आहे. वृषभ आज सगळा निरुत्साह संपून नवीन उत्साह येईल. भाग्याचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खरेदीचा आनंद घ्याल. दिवस चांगला जाईल. मिथुन अती दगदग अणि ताण यामुळे  आज  प्रकृती नाजूक राहील. चंद्र गुरूशी शुभ योग करीत आहे.  परिस्थिती आटोक्यात राहील . बुद्धी आणि चातुर्य यामुळे भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क राशीतील सूर्य सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करून देतील. कामं पटापट होतील. बुद्धीचा उपयोग  चांगल्या कामासाठी करा. शनि गुरू आध्यात्मिक प्रगती साठी शुभ आहे. दिवस चांगला जाईल. सिंह आज षष्ठ स्थानातील चंद्र भ्रमण,दिवस थोडा संथ आणि कंटाळवाणा जाईल. मंगळ स्वभाव थोडा  आक्रमक करेल. आज जोडीदाराला वेळ द्यावा  .त्यांची मदत घेऊन काही कामे पुढे जातील. प्रवास टाळा. दिवस शुभ. कन्या आज संतती साठी कठीण दिवस असून त्यांना मदत करावी लागेल. पंचमात शनि चंद्र काही आध्यात्मिक वाचन, लेखन यासाठी उत्तम राहील. खूप गडबडीत हा दिवस जाईल. पोटाची काळजी घ्या. तुला आज शनिवार अगदी शांतपणे घालवा .खुप दगदग झाली आहे त्यामुळे आता आराम करा. घरा साठी काही खरेदी, काही काम कराल. संतती सुख चांगले. आर्थिक  व्यवहार जपून करा  दिवस चांगला. वृश्चिक आज दिवस प्रवासी आहे . घरी अचानक पाहुणे येतील  बहिण भावाशी गाठ भेट होईल. वातावरण आनंदाने भरून जाईल.महत्त्वाचे निरोप मिळतील. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस चांगला. धनु आज दिवस भरभराटीचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे खुप सहकार्य मिळेल. लाभ स्थानातील सूर्य  सरकारी कामात मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस शुभ आहे. मकर आज राशीतील चंद्र आणि मंगळ केंद्र योग करीत आहेत. जरा जपून रहा. कुठेही अनावश्यक धाडस करू नका. जोडीदाराकडून लाभ होईल. मुलं मनासारखी वागतील. दिवस चांगला जाईल. कुंभ व्ययस्थानातील चंद्र आज जरा थकवा आणि खर्च दाखवत आहे. शुक्र लाभ देईल. दगदग करू नका. प्रवास टाळा. जोडीदाराची काळजी घ्या. वडीलधारी व्यक्ती भेटेल.  दिवस मध्यम आहे. मीन अष्टमात मंगळ आणि बाराव्या स्थानां कडे निघालेल्या गुरूचे प्रभाव क्षेत्र आहे, अतिशय खर्च  करावा लागेल. त्यासाठी आज काही तरतूद करून ठेवा. अर्थात तो खर्च आनंद देणारा असेल. लाभ  ही होतील. संतती सुख मिळेल. दिवस शुभ आहे. शुभम भवतु!!
First published: