मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: या राशीला आज होणार अचानक लाभ; बुध ग्रहाने बदलली रास

राशीभविष्य: या राशीला आज होणार अचानक लाभ; बुध ग्रहाने बदलली रास

आज दिनांक 11 december 2021. कार्तिक शुक्ल अष्टमी.  बुध ग्रह राशी परिवर्तन झाले असून धनु राशीत प्रवेश करेल. त्यानुसार कुठल्या राशीला कसं फळ मिळणार पाहा...

आज दिनांक 11 december 2021. कार्तिक शुक्ल अष्टमी. बुध ग्रह राशी परिवर्तन झाले असून धनु राशीत प्रवेश करेल. त्यानुसार कुठल्या राशीला कसं फळ मिळणार पाहा...

आज दिनांक 11 december 2021. कार्तिक शुक्ल अष्टमी. बुध ग्रह राशी परिवर्तन झाले असून धनु राशीत प्रवेश करेल. त्यानुसार कुठल्या राशीला कसं फळ मिळणार पाहा...

  आज दिनांक 11 december 2021. कार्तिक शुक्ल अष्टमी.आज चंद्राचे भ्रमण दुपारी 4 वाजून सतरा मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत असेल.  बुध ग्रह राशी परिवर्तन  झाले असून धनु राशीत प्रवेश करेल. त्यानुसार पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  मेष

  राशीच्या अष्टम स्थानातून भाग्यात येणारा बुध अनुकूल आहे. सामाजिक जबाबदाऱ्या येतील. प्रवास होतील. दुपारनंतर मानसिक ताण जाणवू शकतो. तुमच्या बुद्धी चातुर्याने यश मिळेल. दिवस चांगला.

  वृषभ

  अष्टमात बुधाचे भ्रमण फारसे शुभ नाही. थोड्या चातुर्याने समस्येतून मार्ग काढा. मात्र आर्थिक लाभ संभवतात. दुपारनंतर दिवस अनुकूल असून आनंदात जाईल.

  मिथुन

  राशीच्या सप्तम स्थानात येणारा बुध जोडीदाराला उत्तम फळ देणारा ठरेल. आर्थिक गणितं जुळतील. व्यवसाय धंद्यात नवीन पान उघडेल. दिवस शुभ संकेत देत आहे.

  कर्क

  पंचमात त्रिग्रह योग आणि षष्ठ स्थानात प्रवेश करणार बुध शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देणारा ठरेल. लेखक, साहित्यिक यांना अनुकूल फळ देणार असून संतती सुख उत्तम राहील. दुपारनंतर सगळे ताण संपून मन रमेल. दिवस चांगला.

  सिंह

  आज राशीच्या पंचमात येणारा बुध तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा, मान मिळवून देईल  संतती मनासारखी वागेल. दुपारनंतर मात्र दिवस प्रतिकूल वळण घेईल. शारीरिक व्याधी कडे दुर्लक्ष नको. दिवस मध्यम.

  कन्या

  राशी स्वामी बुध चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. घरांमधे समारंभ होतील. तुम्ही तुमच्या हुशारीने सर्व काही नीट पार पाडाल. दुपारनंतर जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम.

  तुला

  प्रवास, जन संपर्क, महत्त्वाचा  निर्णय , आणि प्रवास असा हा महिना आहे. सुख लाभेल. भावंडांची साथ मिळेल. दुपारनंतर अचानक प्रकृतीचे त्रास होऊ शकतात. थकवा जाणवेल. दिवस मिश्र फळ देणारा ठरेल.

  वृश्चिक

  धन स्थानात येणारा बुध वाणी मध्ये माधुर्य आणेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. अचानक लाभ संभवतात. दुपार नंतर दिवस अनुकूल आहे.

  धनु

  राशीत प्रवेश करणारा बुध  मानसिक दृष्ट्या थोडा कठीण आहे.  पण जोडीदाराला अनुकूल फळ देईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला असून दुपार नंतर घरी आराम कराल.

  मकर

  राशीच्या व्यय स्थानात येणारा बुध खर्चात वाढ करेल. प्रकृती नाजूक राहील. चंद्र मीन राशीत जाणार आहे. प्रवास योग येतील. भावंडांची भेट येत्या एक दोन दिवसात होईल. दिवस चांगला.

  कुंभ

  लाभ स्थानात बुध मैत्रिणींना भेटणे, मौज मजा, प्रवास, आणि त्यापासून लाभ असा आहे. व्यावसायिक व्यक्तींना शुभ फळ देईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस शुभ.

  मीन

  राशीच्या दशमात येणारा बुध  कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. आई वडील भेटतील. घरात शुभ कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. दिवस चांगला जाईल.

  शुभम भवतु !!

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya