• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: ललितापंचमीचा दिवस या 2 राशींना भाग्यशाली, तुमचं रविवारचं भविष्य...

राशीभविष्य: ललितापंचमीचा दिवस या 2 राशींना भाग्यशाली, तुमचं रविवारचं भविष्य...

आज दिनांक 10.ऑक्टोबर 2021 तिथी अश्विन शुद्ध पंचमी .ललिता पंचमी. कुठल्या राशीला आजच्या दिवस आहे भाग्यशाली वाचा..

  • Share this:
आज दिनांक 10.ऑक्टोबर 2021 तिथी अश्विन शुद्ध पंचमी .ललिता पंचमी. आज  रविवार..चंद्र वृश्चिक राशीत असेल.. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे. षष्ठ स्थानात  मंगळ बुध आरोग्यासंबंधी  काही चिंता उत्पन्न करतील. पण गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करील. धार्मिक कार्य घडेल. दिवस बरा जाईल. वृषभ पंचम स्थानात  मंगळ  बुध  संतती संबंधी काही घटना घडतील. काही नवीन वास्तुसंबंधी निर्णय होईल. वडीलांच्या  प्रकृतीची काळजी घ्या. जोडीदार सहकार्य करेल. दिवस चांगला जाईल. मिथुन आज चंद्र दिवसभर वृश्चिकेत असणार आहे. षष्ठ चंद्र आराम करावा असे सुचवत आहे. चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा मंगळ  बुध घरा संबंधी विचार करावा लागेल. प्रवास ठरतील. तुमचा स्वभाव  तापट होईल. दिवस शुभ. कर्क तृतीय स्थानात मंगळ यापुढील काही दिवस उष्णतेचे विकार देईल. पित्त वाढेल. कुटुंबासाठी काहीतरी करावेसे वाटेल. शुक्र आर्थिक स्थिती उत्तम ठेवेल. प्रवास होतील. मुलांची काळजी घ्या. दिवस शुभ. सिंह राशी च्या धन स्थानात आलेला मंगळ सिंह व्यक्ती ना  तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. शुक्र आकर्षण निर्माण करतो..तेव्हा  जरा जपून रहावे .  कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस चांगला. कन्या आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वात आणखी भर पडेल. समाजासाठी काही करण्याची इच्छा होईल. राशी स्थानात आलेला मंगळ  आता जपून रहा असे संकेत देत आहे.  प्रवासाचे योग. दिवस मध्यम. तुला आज मन पूर्णपणे कुठेतरी गुंतून राहील. संतती, मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल . लाभ होतील. कुठूनतरी पैसा मिळेल. मात्र आर्थिक स्थिती बाबत  काळजी घ्यावी असे वाटते . दिवस शुभ आहे. वृश्चिक राशीतील चंद्र अनेक ठिकाणी यश देईल. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. जुने संबंध  फायदा करून देतील. प्रकृती ठीक राहील .आर्थिक बाजू चांगली राहील. दिवस चांगला  आहे. धनु दशमात  मंगळ बुध वडीलां करता शुभ आहे. पण त्यांच्याशी वाद करू नका. प्रकृती ठीक राहील. आर्थिक बाजू बरी राहील. व्ययस्थानातील  चंद्र मानसिक दृष्ट्या कठीण.. दिवस  मध्यम जाईल. मकर भाग्यात प्रवेश केलेले मंगळ बुध, त्वचा विकार डोके वर काढतील. प्रवास संभवतात. मात्र काळजीपूर्वक रहावे. वाहनापासून जपावे. गुरु कृपा आहे. दिवस चांगला आहे. कुंभ, आज मंगळ अष्टमात  बुधाच्या सोबत आलेला असून  तणावपूर्ण  स्थिती राहील .कार्यक्षेत्रातील अडचणी  बद्दल चौकशी करावी. मंगळ अडचण निर्माण करेल. दिवस चांगला जाईल. मीन आज पासून काही दिवस  जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या  रक्तदाब, मधुमेह असेल तर तपासणी करून घ्यावी. मंगळाची उपासना करावी. आज चंद्र भाग्यात शुभ फळ देणारा ठरेल. शुभ दिवस. शुभम भवतु!!
First published: