मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: वृषभेच्या व्यक्तींसाठी शुभ घटना; मीन राशीच्या व्यक्तींचा होणार खर्च

राशीभविष्य: वृषभेच्या व्यक्तींसाठी शुभ घटना; मीन राशीच्या व्यक्तींचा होणार खर्च

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

यासोबतच कर्क लोकांच्या आरोग्य आणि वैवाहिक जीवनावरही विपरित परिणाम होऊ शकतो, काळजी घ्यावी. याशिवाय संक्रमण काळात खर्चही वाढेल. प्रवासादरम्यान विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आज बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर 2021 कार्तिक शुक्ल षष्ठी .आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करेल. आजचे बारा राशींचे भविष्य वाचा.

आज बुधवार दिनांक 10 नोव्हेंबर 2021 कार्तिक शुक्ल षष्ठी .आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करेल. तिथे  तो गुरू  शनि सोबत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र दशम स्थानात शनि आणि गुरू सोबत असेल. चंद्र शनि योग नकारात्मक मानसिकता वाढवेल. जोडीदाराची काळजी घ्या. काहीसा तणाव असेल. फार काम पडेल. जास्त श्रम टाळा. दिवस शांततेत घालवा.

वृषभ

आज भाग्य स्थानातील चंद्र भ्रमण आध्यात्मिक उन्नती, गुरुकृपा आणि शुभ घटनांचे राहील. आर्थिक बाजू चांगली राहील.भाग्य साथ देईल. दिवस एकूण गडबडीत जाईल. आजारी असल्या सारखं वाटेल. दिवस बरा.

मिथुन

आज अष्टमात चंद्र शनि अणि गुरू विचित्र मानसिक अवस्था करेल. मन कुठेही रमणार नाही  शारीरिक व्याधी डोक वर काढतील. आर्थिक परिस्थिती मात्र चांगली राहील. संतती सुख चांगले. दिवस मध्यम आहे.

कर्क

आज चंद्र शनि सप्तम स्थानात असून जोडीदारासाठी  विशेष अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. खर्च जपून करा.  गुरू आध्यात्मिक प्रगती करेल. धार्मिक कार्य ठरेल.  दिवस शुभ.

सिंह

तृतीय स्थानात मंगळ बुध  सूर्य तुम्हाला तेजस्वी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व  बहाल करेल. मात्र खर्च आणि मिळकत याची गडबड होऊ देऊ नका. कोणालाही कठोर बोलू नका. दिवस मध्यम आहे.

कन्या

आज संतती साठी थोडी  चिंता वाटेल. प्रकृती कडे लक्ष द्या. विशेष करून डोळ्यांची काळजी घ्या.  शुक्र कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करेल. आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा.

दिवस मध्यम जाईल.

तुला

आज राशीच्या चतुर्थ स्थानातील चंद्र शनि गुरू कार्यक्षेत्र आणि घर दोन्हीकडे  अडचणी निर्माण करतील. जास्तीचा ताण पडेल. शुक्र शुभ फळ देईल. गुरु कृपेचा लाभ घ्या. चिंता करू नका. दिवस बरा.

वृश्चिक

आज दिवसभर  थोडा ताण जाणवेल  प्रकृती शिथिल राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. संतती सुख चांगले. घरात खूप काम पडेल. प्रवास योग येतील. जपुन असा. दिवस मध्यम जाईल

धनु

आर्थिक भरभराट, अडकलेला पैसा मिळणे, सरकार कडून लाभ असा हा दिवस आहे. त्यासाठी थोडा प्रयत्‍न केला पाहिजे. कायदे पाळा. पोटाचे त्रास वाढतील.  बोलणे जपून. दिवस बरा आहे.

मकर

आज राशीतील चंद्र शनि  गुरू मन थोडे उद्विग्न ठेवतील. मात्र भरभराटीचा काळ आहे.  दशमातील ग्रह साथ देतील. भाग्यशाली  रास. दिवस बरा जाईल.

कुंभ

आज व्यय स्थानातील चंद्र शनि  गुरू परदेशा संबंधी काही बातमी देतील. प्रकृती जरा शिथिल राहील. आर्थिक बाजु ठीक आहे. व्यवसायात अचानक नवीन संधी मिळतील .दिवस मध्यम जाईल.

मीन

आज दिवस मित्र मैत्रिणींकडून लाभ होण्याचा संभव आहे. व्यय स्थानात गुरू धार्मिक कारणांवर खर्च होईल .काही नवीन ओळखी होतील. पैसा  अतोनात खर्च होईल. जोडीदार आनंदी राहील. नाव लौकिक मिळेल. दिवस शुभ

आहे.

शुभम  भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya