मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशीभविष्य: आजही आहे चंद्र-गुरू शुभयोग; कुणाला होईल फायदा?

राशीभविष्य: आजही आहे चंद्र-गुरू शुभयोग; कुणाला होईल फायदा?

आज दिनांक 10 डिसेंबर 2021 तिथी सप्तमी ,वार शुक्रवार. आज ही चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. चंद्र गुरु शुभ योग आज ही असणार आहे.

आज दिनांक 10 डिसेंबर 2021 तिथी सप्तमी ,वार शुक्रवार. आज ही चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. चंद्र गुरु शुभ योग आज ही असणार आहे.

आज दिनांक 10 डिसेंबर 2021 तिथी सप्तमी ,वार शुक्रवार. आज ही चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. चंद्र गुरु शुभ योग आज ही असणार आहे.

आज दिनांक 10 डिसेंबर 2021 तिथी सप्तमी ,वार शुक्रवार. आज ही चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. चंद्र गुरु शुभ योग आज ही असणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज तुमच्या लाभ स्थानात होणारे चंद्र गुरू भ्रमण आर्थिक लाभ घडवून देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम.

वृषभ

सप्तम स्थानात मंगळ बुध रवि केतू अकस्मात खर्च, जोडीदाराची चिंता,  करायला लावील. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील. राशी स्वामी शुक्र भाग्यात असून स्त्रियांना  शुभ  आहे.

मिथुन

राशीच्या भाग्य स्थानातील चंद्र  गुरू भ्रमण अतिशय शुभ असुन भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत. प्रकृती जपा. अष्टमस्थ ग्रह  आहेत . काळजी घ्या. अष्टमात शुक्र  आहे, जोडीदारासाठी शुभ फळ देईल. दिवस शुभ.

कर्क

अष्टम चंद्राच्या प्रभावातून आजचा दिवस फार चांगला नाही. मानसिक अस्वास्थ्य, पोटाचे त्रास संभवतात. मात्र नोकरी पेशा व्यक्तींना शुभ फळ देईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम जाईल.

सिंह

राशीच्या सप्तम स्थानात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल असून दोघांनी मिळून जी काम उरकायची आहेत ती आज करून टाका. संतती कडुन शुभ वार्ता मिळतील. दिवस चांगला जाईल.

कन्या

तृतीय स्थानात एकत्रित असलेले ग्रह  वाणी,  भावंड यावर प्रभाव टाकतील. वाणी प्रखर, स्वभाव तापट होईल. हातून काही मोठे काम घडण्याची शक्यता आहे.  आज दिवस मध्यम जाईल.

तुला

राशी च्या धन स्थानातील सूर्य, मंगळ, रवि,  शुभ आहे. संतती साठी अत्यंत शुभ दिवस राहील  शैक्षणिक क्षेत्रात भरघोस मदत करतील. आर्थिक बाजु चांगली राहील. दिवस शुभ.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ बुध रवि सोबत, प्रकृती संबंधी तक्रारी निर्माण करतील. जास्तीचा खर्च होईल. परदेश गमनअधिक सुलभ होईल. घरांमधे काही जबाबदारी येईल. दिवस बरा जाईल.

धनु

तृतीय चंद्र  गुरू प्रवास योग आणेल. तुम्हाला अनेक दिवस ज्यांना संपर्क करायचा आहे त्यांचा फोन येईल.बहीण भावंडांची भेट घडेल. मकर शुक्र आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. दिवस शुभ.

मकर

आज दिवस  आर्थिक भरभराट, कुटुंबाचे स्वास्थ्य, आणि एखाद्या विशिष्ट चिंतेतून मुक्तता असा आहे. व्यावसायिक निर्णय अचूक ठरल्याने  लाभ होईल. पण शुक्र राशी स्थानात आहे, अधिक खर्च , परदेशवारी संबंधी बोलणी होतील. दिवस शुभ.

कुंभ

राशीतून होणारे चंद्र भ्रमण शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भाग्यशाली  दिवस आहे. बहिण भावंड भेट देतील. प्रकृती उत्तम राहील. दिवस उत्तम.

मीन

राशीच्या व्यय स्थानात चंद्र प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक स्थिती सांभाळा. अतोनात खर्च होईल.  ग्रह सावधगिरीचा इशारा देताहेत. दिवस मध्यम जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya