• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: महिन्याची सुरुवात होणार शुभ नक्षत्राने; 3 राशींसाठी दिवस आहे शुभ

राशीभविष्य: महिन्याची सुरुवात होणार शुभ नक्षत्राने; 3 राशींसाठी दिवस आहे शुभ

आज दिनांक 27 September 2021.आज सोमवार सप्तमी श्राद्ध. चंद्र आज रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 27 September 2021.आज सोमवार सप्तमी श्राद्ध. चंद्र आज रोहिणी नक्षत्रात असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर 2021 दशमी श्राद्ध. ऑक्टोबर महिन्याची सुरवात अत्यंत शुभ अश्या पुष्य नक्षत्राने होणार आहे. वाचा आज तुमच्या राशीत काय?

  • Share this:
आज शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर 2021 दशमी श्राद्ध.  आज चंद्र  कर्क राशीतून भ्रमण करणार आहे. तिथून तो गुरू च्या दृष्टीत असेल. महिन्याची सुरवात अत्यंत शुभ अश्या पुष्य नक्षत्राने होणार आहे. आजचे बारा राशींचे  राशी भविष्य.. मेष या राशीच्या व्यक्ती साठी  आजचा दिवस उत्तम असुन घरांमधे काही विशेष काम निघू शकते. सुट्टी घेऊन आराम करावा अशी इच्छा होईल. आईशी  संबंध मधुर राहतील. धार्मिक कारणासाठी खर्च होईल. दिवस चांगला. वृषभ राशीच्या  तृतीय स्थानातून चंद्र भ्रमण होत आहे. भावंडाची गाठभेट होईल .संघर्ष टाळा मृदू भाषा वापरा. छोटे प्रवास  संभवतात. दिवस आनंदाने  व्यतीत होईल. मिथुन राशी च्या धन स्थानी असलेला चंद्र आर्थिक बाजु सांभाळेल. आनंदात दिवस व्यतीत  होईल .धार्मिक कामा करता खर्च कराल. समाधानकारक  दिवस. कर्क आज  राशिस्थानी चंद्र, तृतीय मंगळ भ्रमण  तुम्हाला  आग्रही बनवेल. पैसा  खर्च होईल. दिवस  काळजीपूर्वक घालवा. गुरु कृपा आहे. शनी जप करणे  फायद्याचे ठरेल. सिंह राशीच्या व्ययस्थानातील   चंद्र  काही ताण निर्माण करेल. खर्च होतील. आज दिवस  मध्यम आहे..कायदा  व सुव्यवस्था सांभाळुन रहा. कलेत रुची वाढेल. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची. दिवस मध्यम आहे . कन्या राशीच्या लाभ स्थानातील चंद्र  शुभ असुन प्रगतीचा नवीन  मार्ग  निघेल. अचानक   मित्रांचे फोन येतील. गाठीभेटी होतील. मौजमजा करण्याचा दिवस . काळजी नको.दिवस चांगला जाईल. तुला आज दिवस कार्यालयीन कामकाज करण्यात  घालवा. मानसिक ताण कमी होईल. थोडा वेळ  स्वतः साठी ठेवावा. घराकडे  लक्ष द्यावे.  राशीतील शुक्र आता पुढच्या राशीत जाण्याची वेळ आली  आहे. दिवस मध्यम  आहे. वृश्चिक कर्क राशीतील,  चंद्र आध्यात्मिक  कल  वाढवतो.  राहु  सप्तमात, मंगळ लाभात अशी ग्रह स्थिती  अनुकूल आहे. प्रवास सांभाळून करा. गुरुकृपा  आहे. शुभ दिवस. धनु आज धनु राशीच्या व्यक्तींनी काळजी  घ्यावी. वाहन जपून चालवावे. त्रास होण्याची शक्यता  आहे. कार्यक्षेत्रात काहीसा संथ दिवस. गणेश उपासना फायद्याची ठरेल. मकर राशी च्या समोरील चंद्र,  राशिस्थानी शनी पंचमात  राहू ही  ग्रहस्थिती अचानक येणारे  प्रश्न  सुचवतात. मुलांच्या प्रकृतीला जपावे. प्रवासात सांभाळून राहावे.  रवि उपासना करत  रहावी. कुंभ प्रकृतीकडे लक्ष द्या, राशी च्या व्यय स्थानातील गुरू,  चतुर्थात राहू  ही  ग्रह स्थिती  आहे.  बदल  घडले तर  बरे असे वाटेल.मानसिक आंदोलने होतील. . दिवस मध्यम आहे. मीन पंचमात चंद्र  संतती कडे लक्ष द्या असे सुचवतो.काही शुभ वर्तमान येऊ शकते. शनी देव  साथ देतील. कुटुंबा  सोबत  वेळ घालवावा . .गुरूची उपासना  करावी. दिवस चांगला आहे. शुभम भवतु.
First published: