Home /News /astrology /

राशीभविष्य: चंद्र-मंगळ योग ठरणार लक्ष्मीकारक; या राशींना आज मिळणार फायदा

राशीभविष्य: चंद्र-मंगळ योग ठरणार लक्ष्मीकारक; या राशींना आज मिळणार फायदा

आज बुधवार, दिनांक 1 डिसेंबर 2021. कार्तिक कृष्ण द्वादशी. चंद्र आज सकाळी 7.30 नंतर तुला राशीत प्रवेश करेल. कुठल्या राशीला आज मिळेल फायदा?

आज बुधवार, दिनांक 1 डिसेंबर 2021. कार्तिक कृष्ण द्वादशी. चंद्र आज सकाळी 7.30 नंतर तुला राशीत प्रवेश करेल. चंद्र-मंगळ योग लक्ष्मीकारक ठरेल. आजचे बारा राशींचे  भविष्य .. मेष आज आपल्या संतापी  स्वभावाला काबूत ठेवून काम करा.  शनि दशम स्थानात  असून  कार्य क्षेत्रात शुभ घटना घडतील. शुक्र  उत्तम  आर्थिक लाभ देईल. दिवस चांगला आहे. वृषभ काही  जणांना प्रकृती अस्वस्थ वाटेल.  सर्दीचे, पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष नको. हाती घेतलेली कामे पूर्ण करा. अति  खर्च टाळा. दिवस मध्यम . मिथुन कामात आणि शिक्षणात  प्रगती होईल. प्रकृती अस्वस्थ वाटत असेल  तर  आज जपुन रहा. खर्च वाढेल. मुलांकडे  जास्त लक्ष द्यावे लागेल. ईश्वरी आराधना करावी. कर्क चतुर्थ स्थानात मंगळ थोडी  धुसफूस वाढवत असेल पण शांत रहा लौकरच सगळे ठीक होईल. सप्तम शनि, जोडीदाराला त्रासदायक ठरेल. .घरातल्या शुभ घटनांची सुरवात.. दिवस अनुकूल आहे. सिंह ही कुटुंबवत्सल राशी  आहे. आज दिवस समाधानात जाईल. राशी च्या तृतीय स्थानातील मंगळ आणि चंद्र  प्रवास घडवतील. इच्छा पूर्ती होईल. भावंडाची भेट होईल. दिवस  चांगला आहे. कन्या आज आर्थिक घडामोडी  होतील  कुटुंबीयांसाठी वेळ काढला तर बरे होईल. महिला वर्ग नेहमीच उत्साही असतो. आजही  दिवस तसाच आहे.संवाद होतील. चांगले फळ मिळेल. दिवस शुभ आहे. तुला राशीत चंद्र  मंगळ. मातेचं  आरोग्य बिघडलेले असू शकेल. घरातली  विजेची उपकरणे सांभाळून वापरा.  दुरुस्ती निघू शकते.  आर्थिक ताण येईल. प्रकृती जपा. वृश्चिक व्यय स्थानातील चंद्र मंगळ, मतभेद, कुरबुरी  घडवून आणतील. अधिकाऱ्यांशी चर्चा करून मग निर्णय  घ्या. अचानक  छोटा प्रवास  संभवतो. जरा जपून रहा. धनु आज दिवस जरा वादग्रस्त ठरू शकतो  मित्रांशी वाद करु नका. नोकरी  व्यवसायातून लाभ  संभवतात. मात्र  सरळ मार्गाने जा. साडेसाती असली तरी गुरुकृपेने मार्ग निघेल.  दिवस चांगला. मकर राशी स्थानात  मार्गी शनि महाराज शुभ फळ देतील. आप्तेष्टांना नाराज करू नका. त्यांना महत्त्व द्या. आर्थिक घडी बसवण्याचे प्रयत्‍न करा. कामाच्या ठिकाणी भरपूर वेळ द्यावा लागणार आहे. दिवस चांगला आहे. कुंभ दिवस उत्तम. आता कामांना वेग येणार आहे  प्रवास योग  येतील. भाग्य साथ देईल. शत्रू पिडा संभवते. पण विजय  तुमचाच होईल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही  धार्मिक कामात मन रमेल. मीन जरा जपून राहावे असे  ग्रहमानआहे .एकाग्र राहून काम करा. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची ठरेल. यश मिळेल पण प्रयत्नाने.  संतती  कडे  लक्ष द्यावे लागेल. दिवस मध्यम आहे. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या