मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीतील चंद्र आज आर्थिक लाभ घडवणार; पाहा तुमच्या राशीत काय

दैनंदिन राशिभविष्य : 'या' राशीतील चंद्र आज आर्थिक लाभ घडवणार; पाहा तुमच्या राशीत काय

Horoscope 03 April 2022 : आज चैत्र शुद्ध द्वितीया. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

Horoscope 03 April 2022 : आज चैत्र शुद्ध द्वितीया. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

Horoscope 03 April 2022 : आज चैत्र शुद्ध द्वितीया. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 03 एप्रिल 2022 रविवार. तिथी चैत्र शुद्ध द्वितीया. आज चंद्र मेष राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष व्यय रवी आणि बुध, कायद्याचे पालन करा असे सांगत आहेत. राशीतील चंद्र आर्थिक लाभ घडवेल. गुरू शुक्र दशमात आहेत, कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ. वृषभ व्यय चंद्र तुम्हाला मानसिक ताण देईल. स्वतःवर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस मध्यम आहे. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्र आर्थिक आणि मानसिक ताण दूर करेल. भावंडांशी काही तरी कुरबुर होईल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क आज दिवस कुटुंबीयांसोबत घालवा. स्वतःला वेळ द्या. काही आर्थिक प्रश्न सोडवावे लागतील. धार्मिक आस्था वाढीस लागेल. दिवस उत्तम आहे. सिंह भाग्यातील चंद्र शैक्षणिक क्षेत्रात खूप घडामोडी घडवेल. तुम्ही केंद्र स्थानी असाल. संततीची काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. दिवस शुभ. कन्या आज दिवस कष्ट घेऊन येईल. थोडी हुरहूर मनात राहिल. चंद्र कामाचा ताण देईल. घरामध्ये काही नवीन बदल कराल. दिवस मध्यम आहे तूळ आज दिवस दगदग, प्रवास यांनी तुम्हाला त्रस्त करेल. वैवाहिक सुख मिळेल. लाभ होतील. मात्र चंद्र राहू विचित्र अनुभव देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. फार कष्ट करू नका. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला. धनु आज राशीपंचम स्थानात चंद्र कुटुंबात आनंद निर्माण करेल. आर्थिक देणंघेणं होईल. नातेवाईक भेट होण्याचे संकेत आहेत. दिवस उत्तम. मकर आजचा दिवस हा घर आणि कुटुंब यांना वेळ देण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक बाजू ठिक राहिल. दिवस मध्यम आहे. कुंभ व्यय मंगळ शनि घरात काही विचित्र अनुभव देतील. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात जास्तीची काम निघतील. आनंदात दिवस जाईल. मीन आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्त्वाचे निरोप मिळतील. राशीतील बुध रवि अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस शुभ आहे. शुभम भवतु!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या