मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आज चंद्र-मंगळ योग; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आज चंद्र-मंगळ योग; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम पाहा

20 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.

20 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.

चंद्र आज वृषभ राशीत भ्रमण करेल. तिथून तो मंगळासोबत युती करेल.

आज दिनांक 20 ऑगस्ट शनिवार. आज श्रावण कृष्ण नवमी. चंद्र आज वृषभ राशीत भ्रमण करेल. तिथून तो मंगळा सोबत युती करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज द्वितीय चंद्र कौटुंबिक कामासाठी प्रवास योग घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील.. दिवस शुभ. वृषभ आज राशी स्थानातील चंद्र कुटुंबासाठी काही विशेष घडामोडी, आनंद आणि गृह सौख्य देईल. धार्मिक समारंभात भाग घ्याल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल.. उत्तम दिवस. मिथुन राशी च्या व्यय स्थानातील चंद्र मंगलाशी विशेष योग करीत आहे, उच्च प्रतीचे अध्यात्मिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल.खर्च वाढेल . प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. कर्क लाभ स्थानात चंद्र काही आनंदी अनुभव देईल.आर्थिक बाजू उत्तम राहील..मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती उत्तम राहील. दिवस मजेत जाईल . सिंह आज चंद्र मंगळ योग आहे, आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसेच कुटुंबसुख लाभेल. प्रकृती नाजूक राहील. जोडीदाराला वेळ द्या. प्रवास घडेल. दिवस शुभ. कन्या आज चंद्र भाग्य स्थानात आहे तुमच्यावर कुटुंबाच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ येईल .सामाजिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात याल.. गुरू जोडीदाराची मदत करेल. दिवस शुभ. तुला आज राशी च्या अष्टमात चंद्र मंगळ उच्च अध्यात्मिक फळ देण्यास सज्ज आहे. गृह आणि धार्मिक क्षेत्रात यश मिळेल. प्रकृती ठीक राहील . खर्च होतील..दिवस शुभ. वृश्चिक आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृती संबंधी अनिष्ट फळ देईल..घरा मध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास योग येतील.दिवस मध्यम. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे . कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. अचानक आर्थिक लाभ होतील . गुरू घरामध्ये शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनि राशी स्थानात आहे. काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता निर्माण होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. कार्यालयीन कामकाज वाढेल.नातेवाईक भेट संभवते. मध्यम दिवस. कुंभ चंद्र मंगळ योग आज सांभाळून दिवस घालवा असे सुचवीत आहे. संतती कडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग.घरामध्ये विशेष घटना घडतील . दिवस शुभ. मीन आज चंद्र आर्थिक दृष्ट्या घडामोडी घडवेल.घरामध्ये काही त्रासदायक घटना घडतील .प्रकृती जपा. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या