मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

आर्थिक लाभासोबत वैवाहिक सुखही लाभणार; सविस्तर पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

आर्थिक लाभासोबत वैवाहिक सुखही लाभणार; सविस्तर पाहा तुमचं आजचं राशिभविष्य

13 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.

13 ऑगस्ट 2022 रोजीचं राशिभविष्य.

या राशींसाठी आजचा दिवस शुभ ठरणार, धनलाभ होणार.

आज दिनांक 13 ऑगस्ट 2022, शनिवार. आज श्रावण कृष्ण द्वितीया. आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष लाभात चंद्र मित्रमैत्रिणी आणि प्रवासबाबतीत आज शुभ फळ देईल. राशीतील राहू मानसिक क्लेश देईल. त्यादृष्टीने सावध असावं. द्वितीय मंगळ आर्थिकदृष्ट्या जपून रहा असं संकेत देत आहे. कुटुंबासोबत आनंदात दिवस व्यतीत होईल. दिवस चांगला. वृषभ आज राशीच्या दशम स्थानातील चंद्र कार्यक्षेत्रात काही विशेष काम काढेल. आनंद मिळेल. आईवडील भेटतील. तृतीय शुक्र कला प्रकारात रुची निर्माण करेल. उत्तम दिवस. मिथुन चंद्रभ्रमण भाग्य योग करत आहे. उच्च प्रतीचे कौटुंबिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू उत्तम. दिवस उत्तम जाईल. कर्क अष्टम चंद्र आणि शुक्र काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन अस्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. आर्थिक लाभाचे योग येतील. मात्र खर्चही होईल. दिवस मध्यम. सिंह आज सप्तम चंद्र वैवाहिक सुख, लाभ मिळवून देईल. मन आनंदी राहिल. तसंच आर्थिक सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. संतती आनंदी राहिल. दिवस शुभ. कन्या आज चंद्र षष्ठ स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही व्यग्र राहाल. आदर आणि सन्मान वाढेल. शुक्र विवाह जमण्याकरता मदत करेल. दिवस मध्यम. तूळ आज चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. संततीचे मन सांभाळा. दिवस शुभ. वृश्चिक आज मानसिक ताणात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी मध्यम फळ देईल. निरुत्साह वाटेल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी राहिल. दिवस मध्यम. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. चंद्र शुभ फळ देईल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. मकर शनी मकर राशीमध्ये वक्री असून ताण निर्माण करील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिक लाभ होतील. उत्तम दिवस. कुंभ शुक्र-चंद्र योग आज दिवस सांभाळून घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र मानसिक ताण घडवेल.घरामध्ये काही विशेष घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. खर्च संभवतात. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या