Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : संतती सुख लाभेल; कुटुंब आणि मुलांना वेळ द्या

दैनंदिन राशिभविष्य : संतती सुख लाभेल; कुटुंब आणि मुलांना वेळ द्या

Horoscope Today : तुमचा आजचा दिवस कसा जाणार पाहा तुमचं आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 09 मार्च 2022 बुधवार. तिथी फाल्गुन शुक्ल सप्तमी. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. तिथून तो शनि मंगल शुक्र सोबत योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष सामाजिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक लाभ असा हा दिवस आनंदात जाईल. मंगळ शुक्र शनी दशमात आहेत, कामासाठी वेळ द्यावा लागेल. दिवस शुभ. वृषभ राशीतील राहू चंद्र तुम्हाला मानसिक ताण देईल. स्वतःवर खर्च कराल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. धार्मिक कामासाठी वेळ द्याल. दिवस चांगला आहे. मिथुन राशीच्या व्यय स्थानात चंद्र राहू आर्थिक आणि मानसिक ताण निर्माण करेल. भावंडांशी काही तरी कुरबुर होईल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क आज दिवस कुटुंबीयांसोबत घालवा. संततीला वेळ द्या. त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम आहे. सिंह दशम चंद्र राहू कार्य क्षेत्रात खूप घडामोडी घडतील. तुम्ही केंद्र स्थानी असाल. संततीची काही चिंता असेल तर ती आता दूर होईल. दिवस शुभ. कन्या आज दिवस भाग्य घेऊन येईल. मात्र थोडी हुरहूर मनात राहील. चंद्र कामाचा ताण देईल. संतती सुख लाभेल. तुमचे नाव होणार आहे. दिवस चांगला आहे. तूळ आज दिवस मानसिक ताण, शारीरिक कष्ट यांनी तुम्हाला त्रस्त करेल. संतती सुख मिळेल. लाभ होतील. मात्र चंद्र राहू काही विचित्र अनुभव देईल. दिवस मध्यम. वृश्चिक आज कार्यालयीन प्रश्नांचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. फार कष्ट करू नका. दिवस मध्यम. धनु आज धन स्थानात शुक्र मंगळ कुटुंबात आनंद निर्माण करतील. आर्थिक देणे घेणे होईल. नातेवाईक नाराज होण्याचे संकेत आहेत. दिवस उत्तम. मकर आजचा दिवस हा घर आणि संतती यांना वेळ देण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक बाजू ठिक राहील. दिवस मध्यम आहे. कुंभ व्यय मंगळ शुक्र घरात काही विशेष अनुभव देतील. आईवडील नाराज होणार नाहीत याची काळजी घ्या. घरात जास्तीची कामं निघतील. जोडीदारासोबत आनंदात दिवस जाईल. मीन आज कुठे तरी प्रवासाला जाण्याचा बेत ठरेल. भावंडं भेटतील. महत्त्वाचे निरोप मिळतील. काही शत्रू निर्माण होतील. दिवस मध्यम आहे. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या