मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

सिंह, तूळ, मीन राशीसाठी आज लाभाचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

सिंह, तूळ, मीन राशीसाठी आज लाभाचा दिवस; पाहा तुमचं राशिभविष्य

Horoscope 09 April, 2022 : पाहा आज शनिवारचं बारा राशींचं भविष्य.

Horoscope 09 April, 2022 : पाहा आज शनिवारचं बारा राशींचं भविष्य.

Horoscope 09 April, 2022 : पाहा आज शनिवारचं बारा राशींचं भविष्य.

आज दिनांक 09 एप्रिल 2022 वार शनिवार. आज चैत्र शुक्ल अष्टमी. आज चंद्र पुनर्वसु नक्षत्रातून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तृतीय स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. लाभस्थानातील मंगळ गुरू धार्मिक आस्था निर्माण करतील. प्रवास होतील. दिवस शुभ. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानातील चंद्र आज आर्थिक, व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठिक राहिल. भाग्य स्थानातील शनी अनुकूल नाही. दशम मंगळ उत्तम नावलौकिक देईल. शुभ दिवस. मिथुन आज राशी स्थानातील चंद्र भेटीसाठी उत्तम आहे. शनी मात्र प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष असू द्या. दिवस शुभ जाईल. कर्क चंद्र आज विविध क्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक व्यय संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल आणि ती तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. संतती सुख उत्तम मिळेल. दिवस शुभ. सिंह आज दिवस अनेक लाभ घडवणारा आहे. आज मन आनंदी राहिल. गुरुकृपेने मार्ग मोकळा होईल. गृह लाभ होइल. दिवस जोडीदाराला आर्थिक लाभ घडवेल. कन्या आज दिवस मध्यम असून प्रकृती जरा जपून असावे. काही विचित्र अशी हुरहूर लागून राहिल. कार्यक्षेत्रात भरपूर काम कराल. प्रवास योग येतील. काळजी घ्या. दिवस ठिक आहे. तूळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्र जीवनात सुखाचे क्षण निर्माण करेल. खरेदी कराल. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. घरात काही विशेष घटना घडतील. लाभ देणारा दिवस. वृश्चिक चंद्रभ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी, अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम. धनु चंद्रभ्रमण आज कार्यालयीन जीवनात यश देईल. भावंडांशी मंगळ मतभेद करील. जोडीदाराची काळजी लागून राहिल. दिवस मध्यम. मकर राशीच्या षष्ठ स्थानातील चंद्रभ्रमण जबाबदारी आणेल. त्यात तुम्ही अडकून जाल. मंगळ गुरू खर्चाचे नवीन मार्ग तयार करतील. तसंच प्राप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. . कुंभ चंद्र पंचम स्थानात आहे. व्यय शनी, राशीतील मंगळ कायदा पाळा असं सांगत आहे. सांभाळून राहा. दिवस मध्यम जाईल. मीन कौटुंबिक लाभ देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. वैवाहिक जीवन सुखाचे राहिल. दिवस अतिशय शुभ आहे. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या