मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : मंगळाचे गोचर कुंभ राशीत; या 2 राशींवर होणार परिणाम

दैनंदिन राशिभविष्य : मंगळाचे गोचर कुंभ राशीत; या 2 राशींवर होणार परिणाम

Horoscope : मंगळाचे गोचर कुंभ राशीत झाले असून पुढचे काही दिवस मंगळ कुंभेत राहिल.

Horoscope : मंगळाचे गोचर कुंभ राशीत झाले असून पुढचे काही दिवस मंगळ कुंभेत राहिल.

Horoscope : मंगळाचे गोचर कुंभ राशीत झाले असून पुढचे काही दिवस मंगळ कुंभेत राहिल.

आज दिनांक 08 एप्रिल 2022. वार शुक्रवार. आज चैत्र शुद्ध सप्तमी आहे. दिनांक 07 एप्रिल रोजी मंगळाचे गोचर कुंभ राशीत झाले असून पुढचे काही दिवस मंगळ कुंभेत राहील. तिथे तो गुरू शुक्र आणि मंगळ सोबत असेल. कर्क आणि मीन राशीच्या व्यक्ती ना हे गोचर अनुकूल नाही. आज चंद्र मिथुन राशीत आहे. पाहूया आजचे राशीभविष्य. मेष राशीच्या लाभस्थनात आलेला मंगळ अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. त्यावर मेहनत करून यश प्राप्त होईल. मित्र मंडळ मदत करेल. आज प्रवास योग येणार आहे. उत्तम दिवस. वृषभ राशीच्या दशम स्थानात आलेला मंगळ अती शुभ असून अनेक नव्या संधी प्राप्त करून देईल. उत्तम प्राप्ती होईल. अनेक लाभ होतील. दिवस उत्तम. मिथुन राशीतील चंद्राची मंगळाशी नव पंचम युती शुभ असून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. प्रकृती जपा. दिवस सुंदर. कर्क अष्टमात प्रवेश केलेला मंगळ सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज व्ययस्थानात असून नुकसान होण्यापासून सावध राहा असे सुचवीत आहे. दिवस मध्यम जपून रहा. सिंह राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्रमंडळीकडून अनेक लाभ होतील. दिवस शुभ. कन्या सहावा मंगळ आणि दशम चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. शत्रू पिडा होईल. मात्र विजय तुमचाच होईल. दिवस शुभ. तूळ  आज दिवस अतिशय शुभ असून भाग्य उदय होईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षण आणि संततीसाठी शुभ दिवस आहे. वृश्चिक आज दिवस अतिशय जपून राहण्याचा आहे. गृह सौख्य, माता पिता, वाहन याबाबत सांभाळून राहा. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस मध्यम फळ देईल. धनु तृतीय स्थानात मंगळ भावंडांशी मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल.साहसी आणि कठोर स्वभाव होईल. जोडीदार सोबत दिवस घालवा. मकर आता जरा शांत आणि स्थैर्य मिळेल. मंगळ कुंभेत गेल्याने शनि मंगळ युती समाप्त झाली असून ताण कमी होईल. आर्थिक आणि कौटुंबिक स्थैर्य मिळेल. दिवस उत्तम. कुंभ राशीमध्ये गुरूसोबत मंगळ आहे. अचानक स्वभावात तेज येईल कार्य करण्याची इच्छा होईल. संतती आनंदी असेल. दिवस उत्तम आहे. मीन व्यय स्थानात मंगळ गुरू शुक्र अशी ग्रहस्थिती खर्च आणि शारीरिक त्रास दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या