Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : प्रकृती जपा, कुटुंबातही समस्या निर्माण होण्याची शक्यता

दैनंदिन राशिभविष्य : प्रकृती जपा, कुटुंबातही समस्या निर्माण होण्याची शक्यता

Daily Horoscope 10 May 2022 : आजचा दिवस सावध राहण्याचाच आहे. तुमच्या राशीनुसार पाहा तुमचं राशिभविष्य.

आज दिनांक 10 मे 2022. वार मंगळवार. आज आहे वैशाख शुक्ल नवमी. आज चंद्र सिंह राशीत असेल.पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या लाभ स्थानात शनी आणि मंगळ युती ही कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या घटना घडवून आणेल. मित्रमैत्रिणीची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. दिवस मध्यम. वृषभ दशम स्थानात आलेला शनी त्रस्त करेल. एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल. प्रवास योग येतील. चतुर्थ चंद्र गृहसौख्यात वाढ करेल. दिवस शुभ. मिथुन मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी प्रकृतीची काळजी घ्यावी. गुरू अनुकूल आहे. मात्र शनी उपासना जरूर करा. तृतीय चंद्र आहे. प्रवास योग येतील. दिवस बरा. कर्क राशीच्या अष्टमात शनी मंगळ प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला. सिंह आजचे चंद्रभ्रमण राशी स्थानात आहे. घरातल्या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे. घराकडे विशेष लक्ष द्या. उत्तम दिवस. कन्या राशीच्या व्यय स्थानात येणारे चंद्र भ्रमण सावध राहा असं सांगत आहे. प्रवासात अडथळे येतील. आर्थिक व्यय होईल. स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. दिवस मध्यम. तूळ गृहकलह, घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे. आर्थिक प्राप्ती होईल. आई वडिलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. जोडीदार आनंदी राहिल. दिवस बरा. वृश्चिक कुटुंब तुमच्यावर नाराज होइल. त्यांना काही समस्या येतील. प्रवासात त्रास, नुकसान संभवते. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम. धनु भाग्य चंद्र आज उत्तम फळ देईल. मात्र शनी-मंगल आर्थिकदृष्ट्या सांभाळून राहावं असं सांगत आहे. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा. मकर सर्वार्थाने जपून राहण्याचा काळ आहे. मंगळ, शनी, चतुर्थ राहू कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडण तंटा होऊ नये म्हणून सावध रहा. घरामध्ये वेळ द्या. दिवस मध्यम. कुंभ राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र म्हणजे कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या केसेसमध्ये किंवा सामाजिक यश असे योग आणतील. तृतीय राहू महत्त्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम. मीन व्ययस्थानात होणारी शनी-मंगळ युती नुकसानीपासून सावध राहा असं सांगत आहे. संतान चिंता वाटेल. आर्थिक नुकसान होतील. जपून राहण्याचा प्रयत्न करा. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या