Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : यश, आर्थिक लाभ आणि भरभराट; भाग्यदायक आहे आजचा दिवस

दैनंदिन राशिभविष्य : यश, आर्थिक लाभ आणि भरभराट; भाग्यदायक आहे आजचा दिवस

Horoscope 05 May 2022 : आज चंद्र मेष/वृषभ राशीतून भ्रमण करेल. तिथून तो राहूसोबत योग करील.

आज दिनांक 29 मे 2022. रविवार. आज वैशाख कृष्ण चतुर्दशी/अमावस्या. आज चंद्र मेष/वृषभ राशीतून भ्रमण करेल. तिथून तो राहूसोबत योग करील. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष संथ आणि साधा दिवस. मन थोडं उद्विग्न राहिल. ईश्वरी उपासना बळ आणि यश देईल. आर्थिक स्थिती ठिक राहिल. कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं लागेल. दिवस मध्यम. वृषभ आज चंद्र राशीतून भ्रमण करीत आहे. मन थोडं नाराज होण्याचे संकेत आहेत. काळजी घ्या. मंगळ धार्मिक आस्था वाढेल असं सुचवत आहेत. दिवस बरा आहे. मिथुन आज शरीर शिथील वाटेल. जास्त दगदग टाळा. नको असलेली कामं गळ्यात येतील. मानसिक ताण येईल. आर्थिक बाजू सांभाळा. दिवस मध्यम. कर्क आज भक्तिमय वातावरणात दिवस मंगलमय होईल. वाचन मनन कराल. संततीसुख मिळेल. धार्मिक कार्यक्रम किंवा पूजेत सहभागी व्हाल. दिवस उत्तम. सिंह आज तुमच्यापुढे कामाचा डोंगर असेल. घरात जास्त ताण न घेता आलेली जबाबदारी पार पाडाल. पितृ सुख मिळेल. दिवस आनंदात पर पडेल. कन्या तुमच्यापुढे आज प्रवास, भेटीगाठी कार्यक्रमात सहभाग असे भरपूर पर्याय असतील. भाग्य साथ देईल. तुम्ही योग्य निर्णय घ्याल. भावंडं भेट होईल. दिवस आनंदी आहे. तूळ आज चंद्र सप्तम आहे. आर्थिक भरभराट होईल घरात आनंदी वातावरण राहिल.जोडीदाराची प्रकृती देखील उत्तम राहिल. दिवस शुभ आहे. वृश्चिक आज सप्तम स्थानात चंद्र तणावमुक्त करेल. धार्मिक कार्यात मन गुंतून राहिल. आर्थिक लाभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस चांगला आहे. धनु आज आठवा चंद्र आर्थिक आणि शारीरिक ताण देईल. जपून रहा. राशीच्या तृतीयात शनी आहे. संततीला क्लेश होतील. दिवस उपासनेत घालवा. मकर शनी प्रवास योग आणेल. तृतीय गुरू आहे. आईवडिलांची, भावंडांची भेट होईल. आर्थिक बाजू सांभाळून राहा. दिवस उत्तम . कुंभ आज दिवस कार्यक्षेत्रात काही विशेष घडामोडींचा आहे. यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. दूरचे प्रवास योग येतील. दिवस उत्तम. मीन आज भाग्यदायक आणि आनंदी दिवस आहे. सगळीकडून सुसंधी, लाभ, प्रवास भेटीगाठी यात दिवस आनंदात निघून जाईल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या