Home /News /astrology /

Weekly Horoscope : कमरेच्या स्नायूंसंदर्भातील विकार उद्भवू शकतात, या आठवड्यात अधिक काळजी घ्या

Weekly Horoscope : कमरेच्या स्नायूंसंदर्भातील विकार उद्भवू शकतात, या आठवड्यात अधिक काळजी घ्या

आज दिनांक 5 जून 2022 रविवार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी. या सप्ताहात होणाऱ्या महत्वाच्या घटना म्हणजे शनि महाराज कुंभ राशीत वक्री झालेले आहेत.

    आज दिनांक 5 जून 2022 रविवार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी. या सप्ताहात होणाऱ्या महत्वाच्या घटना म्हणजे शनि महाराज कुंभ राशीत वक्री झालेले आहेत.तसेच मेष राशीत शुक्र राहू भ्रमण सुरू असून वृषभ राशीत बुधादित्य राज योग आहे .कुंभ राशीत वक्री शनि तर केतू तुला राशीत भ्रमण करीत आहे. मीन राशीमध्ये गुरू मंगळ स्थित असून लौकरच म्हणजे ७ जून रोजी सूर्य मृगशिर्ष नक्षत्रात प्रवेश करेल. या ग्रह स्थिती नुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.(लग्ना नुसार). मेष राशीतील राहू शुक्र तुम्हाला नवीन वस्तु , वस्त्र ,आणि सौंदर्य प्रसाधन खरेदी करण्यास प्रवृत्त करेल.आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती कडे लक्ष ठेवा .कुठलेही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. अहंकार आणि मनावरील ताण प्रकृतीला हानिकारक ठरेल. मात्र गुरू मनाचा धार्मिक गोष्टीकडे कल ठेवेल.सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश देईल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या.एकूण सप्ताह आनंदी आहे. वृषभ राशीतील सुर्य बुध स्वभावात एक प्रकारचा अधिकार आणतील. व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. व्यय राहू शुक्र खर्चामध्ये वाढ करतील. काही कारणास्तव दवाखान्याची पायरी चढावी लागेल. लाभातील गुरू संततीसाठी शुभ असून नाव विवाहिता आनंदाची बातमी देतील. वैवाहिक जीवन सुखाचे राहील.मात्र गैरसमजातून वाद टाळा. मन धार्मिक गोष्टीमध्ये गुंतवा. एखाद्या समारंभात भाग घ्याल.कार्यक्षेत्रात होणाऱ्या महत्वाच्या घटना फायद्याच्या ठरतील. सप्ताह अनुकूल. मिथुन राशीच्या व्यय स्थानात असलेले सूर्य बुध काही खर्चिक बाबी समोर आणतील. प्रवास घडेल .कायदा पाळा.कार्यक्षेत्र मंगळ गुरूच्या शुभ प्रभावात आहे. नवीन संधी मिळतील.वक्री शनि आता अष्टम स्थनाकडे वाटचाल करेल. सावध राहण्याचा काळ आहे. मन शांत ठेवा. छोट्या मोठ्या गोष्टीनी विचलित होऊ नका. संतती चिंता निर्माण होईल. सप्ताह मध्यम फळ देईल. कर्क राशीस्वामी चंद्राचे धन स्थानातून भ्रमण आर्थिक दृष्ट्या उत्तम फळ देईल. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवाल.कार्यक्षेत्रात शुक्र राहू नवीन संधी देतील. मात्र सहजपणे कोणतेही काम होणार नाही. अष्टम शनीची तीव्रता थोडी कमी होईल.घर आणि व्यवसाय यात बदल होऊ शकतो. संधी कडे दुर्लक्ष नको. उत्तम गुरुबळ तुम्हाला सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल सप्ताह शुभ. सिंह राशीस्वामी रवि दशमस्थनात आहे. काम आणि व्यवसाय बाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गुरू बल नसल्याने सांभाळून निर्णय घ्या.भाग्यातील शुक्र राहू धार्मिक स्थानाचे प्रवास घडवतील. अष्टम मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. राशीतील चंद्र शुभ प्रभाव देईल . आर्थिक लाभ होतील. एकूण सप्ताहाचे बल उत्तम आहे. कन्या राशीस्वामी बुध भाग्य स्थानात असून व्यवसाय वृद्धी, प्रवास यात शुभ फळ देईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढेल. अष्टम स्थानातील शुक्र व राहू काही प्रकृतीचे त्रास दाखवीत आहे. कंबर आणि स्नायूमध्ये दुखापत असेल तर काळजी घ्या. स्त्रियांनी वेळीच काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. सप्ताह बरा जाईल. तुला राशीस्वामी शुक्र राहू सोबत आहे. जोडीदाराशी गैरसमजातून वाद होतील. अष्टम रवि बुध पोटाचे किंवा पायाचे त्रास निर्माण करतील .गुरू षष्ठात आहे.प्रकृती जपा शत्रुत्व होऊ देऊ नका मात्र नोकरी व व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. नातेवाईक भेट संभवते.राशीतील केतू अध्यात्मिक बाजू कडे कल ठेवेल.एकूण सप्ताहात मिश्र फळ मिळेल . वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरू सोबत पंचमस्थानात आहे संतती हा या आठवड्याचा केंद्र बिंदू राहील.त्यांच्या साठी वेळ द्या. चतुर्थ स्थानात वक्री शनि घरात अशांत वातावरण निर्माण करेल .आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.नोकरीच्या ठिकाणी जपून रहा. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग येतील.सप्ताहात चंद्र भ्रमण अनुकूल आहे. धनु राशी स्वामी गुरू मंगळ एकत्र आहेत. स्वभावात तेज येईल.घरामध्ये काही दुरुस्ती,सुधारणा करण्यास योग्य काळ.नवीन वास्तु योग येतील.वाहन जपून चालवा. आईवडील आनंदी राहतील. संतात काहीशी खर्चिक आणि चैनी बनेल. सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहिलं. भावंडांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताह मध्यम आहे. मकर राशी स्वामी शनी वक्री आहे.आर्थिक बाबतीत जपून रहा.शेअर मार्केट किंवा अनपेक्षित ठिकाणीं धनप्राप्ती होऊ शकते. मात्र व्यवहार जपून करा.भावंडं भेट होईल.संतातीसुख भरपूर मिळेल. प्रवास योग येतील स्वताहवार विश्वास ठेवून कार्य क्षेत्रात यश मिळवाल. सप्ताहाचा पूर्वार्ध काही कटकटीचा असेल.उत्तरार्ध मात्र शुभ फल देईल. कुंभ राशीतील वक्री शनि मानसिकता काहीशी नकारात्मक करेल.खर्चात वाढ होईल.शनि उपासना करणे गरजेचे आहे. कुटुंबात गैरसमज निर्माण होतील.चतुर्थ सूर्य बुध घरामध्ये काही बदल घडवतील. आई वडील तुमच्यावर प्रसन्न राहतील. बहिण भावंडं भेट होईल.त्यांच्यासाठी खर्च कराल.सप्ताह एकूण मिश्र फळ देईल. मीन राशीस्वामी गुरू राशीत आहे.सात्विक आणि अध्यात्मिक काळ होईल.काही काळ मंगळ देखील राशीत असल्याने स्वभाव तेज होईल.लवकर राग येईल. आर्थिक घडामोडी होतील.प्रवास योग,बंधू भेट संभवते. केतू काही कमरेचे स्नायूंचे विकार निर्माण करेल.जपून रहा.अती दगदग टाळा.सप्ताह मध्यम आहे. शुभम भवतू!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या