Home /News /astrology /

Weekly Horoscope : मधुमेही व्यक्तींनी जपून राहा, विचित्र काही त्रास होण्याची शक्यता; कसा जाईल आठवडा?

Weekly Horoscope : मधुमेही व्यक्तींनी जपून राहा, विचित्र काही त्रास होण्याची शक्यता; कसा जाईल आठवडा?

वाचा तुमच्या आठवड्याचे भविष्य...

    आज दिनांक १२ जून २०२२. वार रविवार. आज ज्येष्ठ शुक्ल द्वादशी/त्रयोदशी .या वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचे राशी बदल झाले. गुरू मंगळ मिनेत तर सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश झाला.बुध वृषभ आणि राहू केतू मेष आणि तुला राशीत भ्रमण करीत असून. नुकताच झालेला सगळ्यात महत्वाचा ग्रह बदल म्हणजे शनीचा कुंभ राशीत प्रवेश. शनि वक्री झाला आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र स्वराशीत असून उत्तम फळ देईल या सप्ताहात दिनांक १३/१४ रोजी असणाऱ्या वटसावित्री पौर्णिमेच्या व शुभ मुहूर्ताच्या सर्वांना शुभेच्छा. या ग्रह स्थिती नुसार पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीत नुकताच आलेला राहू चंद्र ग्रहण योग सुरवातीला जरा उद्विग्न मन:स्थिती करेल. मंगळाचा राशी बदल व्यय स्थानात झाला असून मित्र मंडळी कडून मदत मिळेल.संतती चिंता वाटेल. गुरू शुक्र लाभाचे अनेक मार्ग प्रशस्त करतील . धार्मिक बाबीसाठी खर्च होईल.रवि अधिकारी वर्गाची भेट होईल असे सुचवीत आहे. प्रवास योग आनंद देतील. सप्ताह उत्तम फळ देईल. वृषभ दशमातील शनी वक्री अवस्थेत असून बदलाचा काळ येणार आहे.अचानक एखादी नवीन संधी चालून येईल. ज्यात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नाव होईल. आनंद देणारा हा काळ आहे.व्यय राहू आणि केतू आरोग्य सांभाळा ,असे संकेत देत आहे. भाग्यातील ग्रहामुळे काही मोठ्या पूजा वगैरे होतील. रवि अधिकारी वर्गाकडून लाभ मिळवून देतील.प्रकृती जपून रहा. तुला चंद्रामुळे सप्ताह आनंदात जाईल. मिथुन राशी स्वामी बुध व्ययात रवि सोबत आहे. अधिकार प्राप्ती. प्रमोशन, अकल्पित लाभ असा हा काळ आहे. गुरू मंगळ आर्थिक लाभ घडवतील. मात्र प्रकृतीची तक्रार आता कमी होईल. भाग्यात प्रवेश करणारे वक्री शनी नवीन आनंदाच्या संधी मिळवून देतील. उत्तरार्ध अनुकूल असून उपासना करा. कर्क राशीच्या भाग्य स्थानात गुरू मंगळ असून तुम्हाला अधिकारी वर्ग मदत करेल. प्रमोशनचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदारासाठी अनुकूल काळ आहे. प्रकृती सांभाळा. या काळात शिधा दान करा. प्रवास टाळणे योग्य राहील. दशम स्थानात आलेला राहू स्थान बदल करेल. गुरू बल उत्तम असल्यामुळे आनंदी राहाल. शनि अष्टम आहे. प्रकृतीची काळजी घ्या. सप्ताह चांगला जाईल. सिंह राशी स्वामी रवि दशम स्थानात असून अधिकारी वर्ग भेटेल. बढतीचे योग. सप्तमात येणारा शनि मंगळ कुटुंबात ताण पसरवेल. शनि काही आर्थिक बाबतीत त्रास होतील असे सुचवत आहेत. दूरच्या नातेवाईकांना, मित्रांना भेटण्यासाठी संधी येईल. राहू मन अस्थिर ठेवेल. सप्ताह मध्यम जाईल. कन्या राशी स्वामी बुध भाग्य स्थानात स्वतःची व जोडीदाराची भरभराट होईल. त्यांना अधिकार मिळेल. व्यवसाय धंद्यात चांगला लाभ होईल. संतती चिंता कमी होईल. गुरू महाराज शुभ फल देतील. मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. आठवा राहू विचित्र काही त्रास होण्याची शक्यता दाखवतो. काळजी घ्या.आर्थिक लाभ होतील. षष्ठ शनि शत्रू पिडा होईल. सप्ताह मध्यम जाईल. तुला राशी स्वामी शुक्र सप्तम स्थानात प्रवेश करीत असून गुरू सोबत शुभ योग करेल. शनि पंचमात संततीसाठी उत्तम काळ. घर आणि वाहन खरेदी कराल. आर्थिक गणित जुळून येतील. रवि नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम आहे. आर्थिक दृष्ट्या बरा काळ. मन अस्वस्थ राहील. सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरू सोबत असून पुढील काही दिवस सावध राहण्याचे आहेत. शनि चतुर्थ स्थानात घर आणि वाहन या संबंधी शुभ सूचना देतील. गृह कलह टाळा. संततीकडे लक्ष द्या. त्यांना उत्तम काळ आहे. या काळात काही समस्या निर्माण होतील. चंद्र जोडीदाराला उत्तम असून सप्ताह शुभ जाईल. धनु राशी स्वामी गुरू सोबत मंगळ दूरचे प्रवास योग आणेल. भावंडाना शुभ फळ देईल. वाहन खरेदी होईल महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. घरामध्ये काही बदल कराल. नवीन वास्तूयोग येतील. ह्या काळात काही नवीन सुरवात करू शकता सप्ताह सर्व तऱ्हेने शुभ संकेत देईल. आर्थिक दृष्ट्या भक्कम राहील. मकर शनि आता वक्री असून एक मोठा बदल जघडून येईल. सप्ताहात मंगळ गुरु मीन राशीत एकत्र असून आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. तसेच खर्च देखील होतील. गुरू शुक्र प्रवास योग आणतील. संतती कडे लक्ष द्या. चतुर्थ राहू स्थान बदलाचे योग आणेल. पौर्णिमेच्या आसपास सप्ताह शुभ आहे. कुंभ राशीत वक्री शनि सावध राहण्याचे संकेत देत आहे. स्वभाव उग्र होईल. जोडीदाराशी जपून रहा. गैरसमज करू नका. आर्थिक बाजू भक्कम राहील. उष्णतेचे विकार होतील. प्रकृती जपून राहा. उत्तम वस्तूंची खरेदी होईल. घरामध्ये शुभ कार्य होण्याचे संकेत आहेत सप्ताह आनंदात जाईल . मीन गुरू महाराज राशी स्थानात आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. पूर्वार्ध नवीन संधी मिळतील. जोडीदाराची भरभराट होईल. रवि बुध अधिकार प्राप्ती करून देतील. अचानक अर्थ प्राप्ती होईल. पौर्णिमा आनंदात साजरी कराल. शुभम भवतू,!!
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या