आज शनिवार दिनांक 25 September 2021.आज पंचमी श्राद्ध. चंद्र मेष राशीत भरणी नक्षत्रात भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
आज राशीतील चंद्र बुध शुक्राशी प्रतियोग करीत आहे. व्यवसाय उत्तम राहील.आर्थिक स्थिती ठीक राहील. शत्रूवर विजय मिळवाल. दिवस सर्व साधारण जाईल.
वृषभ
राशीच्या व्यय स्थानातील चंद्र भ्रमण धार्मिक कारणानी खर्च करेल. प्रवास घडतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देणारा काळ आहे. एकूण दिवस मध्यम आणि दगदगीचा जाईल.
मिथुन
आज प्रवासी दिवस असून फार दगदग होणार आहे. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. आश्रम शनि गुरू मन थोडे अस्वस्थ ठेवतील. जोडीदारासाठी शुभ काळ. दिवस बरा आहे.
कर्क
राशीच्या दशमातील चंद्र आज कार्यक्षेत्रात अनेक संधी मिळवून देईल. जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. पराक्रमी आणि आनंदी दिवस.
सिंह
भाग्यशाली रास. धनस्थानातील मंगळ रवि आर्थिक घडामोडी, कधी लाभ तर कधी नुकसान अशी फळ देतील. नोकरीमध्ये प्रवास योग संभवतात. प्रगतीच्या संधी येतील. दिवस चांगला.
कन्या
अष्टमात चंद्र भ्रमण फारसे अनुकूल नाही. दुखापत, मानसिक अस्थिरता असा दिवस आहे. आर्थिकदृष्टय़ा बरा दिवस. शुक्र उत्तम फळ देईल. दिवस मध्यम जाईल.
तुला
राशीच्या सप्तमात होणारे चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार असून भागीदारी मध्ये सामंजस्य करार होईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. घरातील शांतता भंग होऊ शकते. प्रवास सांभाळून करा. दिवस बरा जाईल.
वृश्चिक
राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र शत्रू निर्माण करेल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. आर्थिक स्थिती ठीक राहील. संतती सुख मिळेल. चैनीसाठी खर्च कराल. दिवस बरा जाईल.
धनु
संतती सुख उत्तम राहील. आर्थिक बाजू चांगली राहील. व्यय होऊ नये म्हणून काळजी घ्या. शुक्र केलेल्या कामाचे उत्तम फळ मिळवून देईल. दिवस शुभ आहे.
मकर
आज तुमचा वेळ घरासाठी द्यावा लागेल. जास्तीचे काम पडेल. मिश्र फळ देणारा दिवस आहे. त्यासाठी थोडा प्रयत्न केला पाहिजे. भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहेत.
कुंभ
प्रवास, मौजमजेसाठी खर्च, नातेवाईकांना भेट असा हा दिवस अतिशय आनंदात जाईल. मंगळ अष्टमात आहे. जरा जपून रहा. दिवस मध्यम जाईल.
मीन
आर्थिक लाभ संभवतात. कुटुंबाचे स्वास्थ्य जपा. दिवस जोडीदाराची काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. दिवस शुभ असुन यश मिळवून देईल.
शुभम भवतु!!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.