• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: बुध-शुक्र युतीचा लक्ष्मी नारायण योग या राशींना देणार मोठं फळ

राशीभविष्य: बुध-शुक्र युतीचा लक्ष्मी नारायण योग या राशींना देणार मोठं फळ

आज दिनांक 22 September 2021 बुधवार आज द्वितीया श्राद्ध. चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. पाहू या आजचं राशीभविष्य...

  • Share this:
आज दिनांक 22 September 2021 बुधवार आज  द्वितीया  श्राद्ध .चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. आज  बुध ग्रह  तुला राशीत प्रवेश करेल. बुध शुक्र युती लक्ष्मी नारायण योग करेल. काही राशींना अत्यंत शुभ फळ मिळेल .पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष व्यवसाय भागीदारी साठी अतिशय शुभ काळ असून शत्रू  पराजित होतील. जोडीदार आनंदात असेल. शुभ घटना घडतील. व्ययस्थ चंद्र खर्चात वाढ करेल. दिवस मध्यम जाईल. वृषभ लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील. मुलांची चिंता वाटेल. प्रकृती जपा, पोटाची काळजी घ्या. षष्ठ स्थानात बुध शुक्र नोकरीमध्ये उत्तम फळ देईल. दिवस चांगला. मिथुन राशी स्वामी बुध तुला राशीत  पंचमात प्रवेश करेल .संतती साठी अतिशय चांगला काळ असून घरा मध्ये कलह टाळा. चंद्र  लाभ मिळवुन देईल. प्रवास, मौजमजेसाठी खर्च होईल. दिवस शुभ. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणारा बुध  घर खर्च वाढेल .उंची वस्तु खरेदी कराल. वास्तु योग सफल होतील. वाहन सुख भरपूर मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. दिवस शुभ. सिंह धनस्थानात मंगळ रवि  कुटुंबात काही वाद निर्माण करतील. आर्थिक बाजु ठीक राहील. भावंडाची गाठभेट होईल  त्यांची प्रगती होईल. कले मध्ये रुची वाढेल. अष्टमात  चंद्र हुरहूर जाणवेल. दिवस मध्यम जाईल कन्या राशीतील रवि मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहेत.अग्नी भय, अपघात  यापासून सावध रहा. परंतु धनस्थानात येणारे बुध शुक्र उच्च राहणीमान ,आर्थिक आवक दाखवत आहेत. जोडीदाराची साथ लाभेल. दिवस चांगला. तुला राशीत प्रवेश करणारा बुध खर्चिक स्वभाव करेल. व्यय स्थानात मंगळ सूर्य कायदा पाळा असे सुचवत आहेत. डोळ्यांची काळजी घ्यावी. शत्रू पिडा संभवते. दिवस शुभ. वृश्चिक व्यय स्थानात येणारा बुध खर्चात वाढ करेल. उंची वस्तु खरेदी कराल. उत्तर लाभ होतील.कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस चांगला.. धनु भरपूर काम अणि त्यापासून होणारे लाभ असा दिवस आहे. घरात शांतता राहील. आर्थिक बाजु चांगली. कुटुंबासाठी शुभ काळ आहे. दिवस शुभ आहे. मकर राशीच्या दशमातील बुध शुक्राचे भ्रमण लाभदायी ठरेल. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसाय धंद्यात अनेक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. दिवस चांगला. कुंभ भाग्य स्थानातील बुध शुक्र राजयोग कारक असून पराक्रमाची वाढ करतील. आर्थिक लाभ होतील. व्यय स्थानात गुरू शनि धार्मिक कार्य साठी खर्च करतील. दिवस अनुकूल आहे. मीन आज तुमच्या राशीतील चंद्र आणि अष्टमात बुध शुक्र जरा कठिण परिस्थिती निर्माण करतील. जास्तीचा आर्थिक ताण येईल मन थोडे अस्वस्थ राहील. दिवस मध्यम जाईल. शुभम भवतु!!
First published: