Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज चंद्राचा गुरूशी केंद्रयोग; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

दैनंदिन राशिभविष्य : आज चंद्राचा गुरूशी केंद्रयोग; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

Horoscope 16 March 2022 : आज चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरू आणि रवीशी प्रतियोग करेल.

आज दिनांक 16 मार्च 2022 बुधवार. आज फाल्गुन शुक्ल त्रयोदशी. आज चंद्र सिंह राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरू आणि रविशी प्रतियोग करेल. मेष पंचम चंद्र संतती आणि शिक्षण या बाबतीत आज काही अडचणी निर्माण करेल. राहू अहंकार आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. त्यादृष्टीने सावध असावे. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. दिवस चांगला. वृषभ आज चतुर्थ चंद्र घरामध्ये काही विशेष काम काढेल. आनंद आणि गृहसौख्य मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल. उत्तम दिवस. मिथुन तृतीय चंद्र भ्रमण गुरूशी केंद्र योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. दिवस चांगला जाईल. कर्क द्वितीय चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. दिवस मध्यम. सिंह आज राशीतील चंद्र खूप काम मिळवून देईल. जोडीदार आनंदी राहिल. तसंच संतान सुख लाभेल. वाचन, लेखन यात वेळ घालवा. दिवस शुभ. कन्या आज चंद्र व्यय स्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरी करता मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज लाभातील चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. वृश्चिक आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी उत्तम फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी राहिल. दिवस शुभ. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. गुरू चंद्र योग शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनि मंगळ काही अॅलर्जीचे विकार निर्माण करतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या मध्यम दिवस. कुंभ गुरू चंद्र योग आज आनंदात दिवस घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र गुरू केंद्रयोग आर्थिक लाभ घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs

पुढील बातम्या