मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : चंद्र-गुरू केंद्रयोगामुळे मीनला आर्थिक लाभ; 'या' राशींनी मात्र पैशांबाबतीत जपून राहावं

दैनंदिन राशिभविष्य : चंद्र-गुरू केंद्रयोगामुळे मीनला आर्थिक लाभ; 'या' राशींनी मात्र पैशांबाबतीत जपून राहावं

Horoscope 06 April 2022 : आज चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव, शुभ फळ देईल.

Horoscope 06 April 2022 : आज चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव, शुभ फळ देईल.

Horoscope 06 April 2022 : आज चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव, शुभ फळ देईल.

आज दिनांक 06 एप्रिल, 2022 बुधवार. आज चैत्र शुक्ल पंचमी. श्री पंचमी. आज चंद्र वृषभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष द्वितीय चंद्र कुटुंब आणि आर्थिक बाबतीत आज शुभ फळ देईल. राहू अहंकार आणि मानसिक द्वंद्व निर्माण करतो. त्यादृष्टीने सावध असावं. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. दिवस चांगला. वृषभ आज राशीतील चंद्र घरामध्ये काही विशेष काम काढेल. आनंद आणि गृह सौख्य मिळेल. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल. उत्तम दिवस. मिथुन व्यय चंद्र भ्रमण गुरूशी केंद्र योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. आर्थिक बाजू जपा. दिवस चांगला जाईल. कर्क चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. मन स्थिर होईल. मित्रमंडळ भेटेल. दिवस मध्यम. सिंह आज दशम चंद्र खूप काम मिळवून देईल. जोडीदार आनंदी राहिल. तसंच संतान सुख लाभेल. वाचन लेखन यात वेळ घालवा. दिवस शुभ. कन्या आज चंद्र भाग्यस्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरी करता मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज अष्टम चंद्र मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्र आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. दिवस मध्यम. वृश्चिक आज आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी उत्तम फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी राहील दिवस शुभ. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. आर्थिक बाबी जपा. गुरू चंद्र योग शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनि मंगळ युती आता संपणार आहे. मंगळ ताण निर्माण करील. प्रकृतीकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या मध्यम दिवस. कुंभ गुरू चंद्र योग आज आनंदात दिवस घालवा असे सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र गुरू केंद्रयोग आर्थिक लाभ घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या