मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: 3 राशींच्या व्यक्तींना जाणवू शकतो ताण; 4 राशींसाठी दिवस चांगला

राशीभविष्य: 3 राशींच्या व्यक्तींना जाणवू शकतो ताण; 4 राशींसाठी दिवस चांगला

आज दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार आज आषाढ कृष्ण दशमी. मेष, सिंह, कन्या आणि मीन राशींसाठी मंगळवारचा दिवस चांगला असेल.

आज दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार आज आषाढ कृष्ण दशमी. मेष, सिंह, कन्या आणि मीन राशींसाठी मंगळवारचा दिवस चांगला असेल.

आज दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार आज आषाढ कृष्ण दशमी. मेष, सिंह, कन्या आणि मीन राशींसाठी मंगळवारचा दिवस चांगला असेल.

    आज दिनांक 3 ऑगस्ट 2021 वार मंगळवार आज आषाढ कृष्ण दशमी. चंद्र वृषभ राशीत भ्रमण करीत आहे.

    मेष

    आज काही महत्त्वाची बोलणी होतील .मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. आरोग्य ठीक .दिवस चांगला जाईल .

    वृषभ

    राशीतील चंद्र राहू योगाने थोडा मानसिक ताण जाणवेल. मात्र दैनंदिन कामे सुरळीत होतील. घर खर्च वाढता राहील. दिवस  बरा जाईल.

    मिथुन

    प्रकृतीची तक्रार असेल. अतोनात खर्च तो ही अनावश्यक होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवेल. दिवस मध्यम आहे.

    कर्क

    आज नवीन परिचय होतील. लाभ स्थानातील चंद्र राहू  मित्रांपासून सावधगिरीचा इशारा देत आहेत. वाईट गोष्टींकडे कल होईल. मन थोडे अस्थिर होईल. दिवस बरा आहे.

    सिंह

    राशीतील मंगळ तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल  पण वाद अणि राग दोन्ही आवरा. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. दिवस चांगला जाईल.

    कन्या

    सामाजिक अस्थिरता, आणि एखाद्या विशिष्ट व्यक्ती कडून त्रास किंवा मत्सर असे अनुभव येतील. तुमच्या बुद्धीचा वापर योग्य कामासाठी कराल. एकूण दिवस चांगला आहे.

    तुला

    अष्टमात राहू चंद्र दिवसाचे  गणित, बिघडवतील. काहीतरी  विचित्र  हुरहूर, प्रकृती ची कुरकुर राहील. उत्तरार्ध जरा बरा राहील. आरोग्य जपा. खर्च बेताने करा. दिवस मध्यम.

    वृश्चिक

    वैवाहिक जीवनात  संभ्रमात टाकणार्‍या काही गोष्टी घडतील. खूप मानसिक ताण आणि विचित्र  घटनांचा सामना करावा लागेल. पण आपल्या  मताशी  ठाम रहा. दिवस प्रतिकूल  आहे.

    धनु

    आज शरीर जरा  थकलेले असेल. पण हाताखालच्या व्यक्तींकडून काम होतील. मदत मिळेल. आर्थिक व्यवहार जपून. शत्रू वर नजर ठेवून रहा. दिवस ठीक  आहे.

    मकर

    हे वर्ष संतती चिंता सतत सतावू शकते. नवीन प्रश्न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात काहीशी संभ्रमावस्था राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.  वाहन जपून  चालवा. दिवस  मध्यम जाईल.

    कुंभ

    काही वास्तु विषयक प्रश्न  आज निर्माण होतील. आज घरात जास्तीचे काम पडेल. आर्थिक लाभ होतील. नवीन काही सुरू करणे टाळा. दिवस शांततेत घालवा.

    मीन

    प्रवासात त्रास, नातेवाईकांना भेट किंवा खर्च, मानसिक अस्थिरता  असा हा दिवस आहे. अनेक फोन येतील. मुलाखतीतून यश मिळेल. दिवस चांगला जाईल  .

    शुभम भवतु!!

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya