• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • राशीभविष्य: मेषेला आर्थिक लाभ, तर वृषभेचे वाढणार खर्च; वाचा रविवार कसा असेल?

राशीभविष्य: मेषेला आर्थिक लाभ, तर वृषभेचे वाढणार खर्च; वाचा रविवार कसा असेल?

आज दिनांक 1 ऑगस्ट 2021 रविवार तिथी आषाढ कृष्ण नवमी. दिवस शुभ आहे. पाहा तुमच्या राशीचं भविष्य काय?

  • Share this:
आज दिनांक 1 ऑगस्ट 2021  रविवार  तिथी आषाढ कृष्ण नवमी. चंद्र मेष राशीत उत्तररात्री पर्यंत असेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दिवस समाधानात जाईल. आर्थिक लाभ होणार आहेत. संततीकडून लाभ संभवतात. आरोग्य ठीक राहील. घराकडे लक्ष द्यावे लागेल. दिवस चांगला जाईल. वृषभ आज तुमचा दिवस  निवांत जाणार आहे. खर्च अचानक वाढतील. घरासाठी काही खरेदी करणे गरजेचे वाटेल. भावाकडून लाही लाभ संभवतात. दिवस चांगला. मिथुन आज  अगदी निवांत दिवस घालवा. सध्या तुम्ही कामात  बिझी आहात, काही काम त्रासदायक ठरणार आहेत. भावंडाची काळजी घ्यावी लागेल  दिवस शुभ आहे. कर्क आज तुम्ही घरातच बिझी राहणार आहात. जास्तीचे काम त्याचे नियोजन असा दिवस जाईल. आर्थिक घडामोडी घडतील. धनलाभ होईल. दिवस शुभ. सिंह राशीतील मंगळ उष्णतेचे विकार  देईल. स्वभाव जरा रागीट होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य घडेल. कायदा पाळा. दिवस चांगला जाईल. कन्या आज तुम्हाला आराम करण्याची गरज भासेल. फार दगदग करू नका. प्रकृती सांभाळा. I खर्च फार वाढणार आहे. पण अनपेक्षित लाभ ही होतील. दिवस मध्यम जाईल. तुला आज तुला राशीच्या व्यक्ती जोडीदाराला घेऊन फिरायला,जोडीने खरेदी करायला जाईल. दशमातील सूर्य कार्यक्षेत्रात मोठा अधिकार देईल. दिवस चांगला आहे. वृश्चिक प्रकृती सांभाळा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. आज कोणाशीही वाद नको. मात्र मंगळ लौकरच नवीन संधी उपलब्ध करून देईल. दिवस शुभ. धनु आज संतती साठी काही तरी काम कराव लागेल. त्यासाठी पैसा खर्च होईल. धार्मिक कार्य घडेल. किंवा प्लॅनिंग कराल. एकूण दिवस शुभ आहे. मकर आज तुम्ही घरातली जास्तीची काम आटपून घ्याल. काही विशेष खरेदी होईल. प्रकृती ठीक राहील. वाहन जपून चालवा. आर्थिक गुंतवणूक सांभाळून करा. दिवस शुभ. कुंभ सुट्टीचे निमित्त साधून आज जवळपास मौजमजेचे बेत कराल. काही महत्त्वाचे फोन येतील. भावंडाची भेट होईल. जोडीदाराचा मूड सांभाळा. दिवस चांगला जाईल. मीन आर्थिक ,शारीरिक अणि मानसिक सर्व बाबतीत तुम्ही यशस्वी होणार आहे. अचानक थकलेले देणे मिळेल. प्रकृती साथ देईल. कुटुंब सुख भरपूर मिळेल. दिवस चांगला आहे. शुभम भवतु!!
First published: