Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : चंद्राचा गुरूशी केंद्र योग; तुमच्या राशीवर काय होणार याचा परिणाम?

दैनंदिन राशिभविष्य : चंद्राचा गुरूशी केंद्र योग; तुमच्या राशीवर काय होणार याचा परिणाम?

Horoscope 06 May 2022 : चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करेल. तिथून तो गुरूशी केंद्र योग करेल.

आज दिनांक 06 मे 2022 वार शुक्रवार. आज वैशाख शुक्ल षष्ठी. चंद्र आज मिथुन राशीत भ्रमण करेल. तिथून तो गुरूशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज तृतीय चंद्र प्रवास योग, बंधुभेट घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ. वृषभ आज धन स्थानातील चंद्र गुरू दृष्टीत कुटुंबासाठी काही विशेष खरेदी, आनंद आणि गृहसौख्य मिळेल. सामाजिक जीवनात भाग घ्याल. उत्तम दिवस. मिथुन राशीस्थानातील चंद्र गुरूशी विशेष योग करत आहे. उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. दिवस चांगला जाईल. कर्क व्यय चंद्र आणि गुरू काही अध्यात्मिक अनुभव देतील. आर्थिक बाजू मध्यम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती जपा. दिवस मजेत जाईल. सिंह आज लाभात चंद्र गुरू खूप काम मिळवून देईल. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसंच कुटुंबसुख लाभेल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस शुभ. कन्या आज चंद्र दशमस्थानात आहे. तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरीसाठी मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज भाग्य चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. परदेश आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. खर्च होतील. दिवस शुभ. वृश्चिक आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी अनिष्ट फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. प्रवासाचे योग येतील. गुरू योग शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनी-मंगळ धन स्थानात काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता निर्माण करतील. कुटुंबाकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. शुभ दिवस. कुंभ गुरू-चंद्र योग आज आनंदात दिवस घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र-गुरू आर्थिकदृष्ट्या घडामोडी घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील. जोडीदार आनंदी राहिल. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या