Home /News /astrology /

आर्थिक लाभ होतील पण खर्च जपून करा; कसा जाणार तुमचा दिवस पाहा तुमचं राशिभविष्य

आर्थिक लाभ होतील पण खर्च जपून करा; कसा जाणार तुमचा दिवस पाहा तुमचं राशिभविष्य

Horoscope 31 May 2022 : 31 मे 2022 रोजीचं बाराही राशींचं भविष्य.

आज दिनांक 31 मे 2022 वार मंगळवार. ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा. आज चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरू मंगळाशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीतील राहू आज मन आशंकित ठेवेल. जोडीदाराची चिंता वाटेल. भावंडं भेट होईल. दिवस शांततेत घरी घालवा. शारीरिक ताण घेऊ नका. दिवस बरा आहे. वृषभ आज द्वितीय चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावधगिरीचा इशारा देत आहे. खर्च होईल. दिवस शुभ आहे . मिथुन राशी स्वामी बुध वृषभ राशीत सूर्य सोबत आहे. आता बरेच मार्ग सुलभ होतील. सरकारी काम, कागदपत्र लिखाण यात अडचणी आल्या तरी यश मिळेल. दिवस चांगला. कर्क आज राशीच्या व्यय स्थानात चंद्र असून दैवी संकेत मिळतील. मंगळ गुरू धार्मिक आस्था वाढवतील. अष्टम शनी जपून रहा असं सुचवत आहे. थोडं नैराश्य वाटेल पण खंबीर रहा. दिवस मध्यम आहे. सिंह आज चंद्र भ्रमण शुभ असून प्रकृती ठिक राहिल. मन थोडं चिंतित राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत रहा. लवकरच शुभ घटना घडणार आहेत. दिवस मध्यम. कन्या आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघं मिळून खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. तूळ चंद्राचे भ्रमण भाग्य स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. संततीकडे लक्ष द्या. शांततेत दिवस घालवा. वृश्चिक जोडीदाराला काही त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर येईल. मन अशांत राहिल. खर्च जपून करा. दिवस मध्यम. धनु आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. भावंडाना वेळ द्यावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं वाटेल. दिवस शुभ. मकर राशीतील शनी तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. षष्ठ चंद्र खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. खर्च जपून करा. दिवस बरा. कुंभ आज आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल. दिवस शुभ. मीन राशीच्या व्यय स्थानातील शनी घरामध्ये जास्तीचे खर्च येतील. भटकंतीचे योग येतील. खर्च जपून करा. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहिल. दिवस मध्यम आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या