Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : शनी-मंगळ युतीमुळे स्फोटक परिस्थिती; 'या' राशीमागे साडेसाती

दैनंदिन राशिभविष्य : शनी-मंगळ युतीमुळे स्फोटक परिस्थिती; 'या' राशीमागे साडेसाती

Horoscope 30 April 2022 : आज शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून तिथे असलेल्या मंगळासोबत पुढील काही दिवस तो असेल. शनी मंगळ परत एकत्र आल्याने काहीशी स्फोटक परिस्थिती निर्माण होईल.

आज दिनांक 30 एप्रिल 2022 शनिवार. आज चैत्र अमावस्या. शनी अमावस्या. आज शनीचा कुंभ राशीत प्रवेश झाला असून तिथे असलेल्या मंगळासोबत पुढील काही दिवस तो असेल. शनी मंगळ परत एकत्र आल्याने काहीशी स्फोटक परिस्थिती निर्माण होईल. मीन राशीला साडेसातीचा काळ सुरू होईल. तसंच कर्क राशीला अष्टम शनी सुरू होईल. धनु राशीचा साडेसाती खंडित होईल. ह्या काळात जप आणि अनुष्ठान केल्याने लाभ होईल. आज चंद्र मेष राशीत असून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीतील चंद्र आणि लाभ स्थानातील शनी, मंगळ मानसिक ताण निर्माण करतील. व्यय गुरू शुक्र आहे. धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. दिवस मध्यम. वृषभ दशम स्थानातील शनी मंगळ पितृ चिंता, कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. चंद्राचं व्यय स्थानातील भ्रमण नुकसान, आर्थिक चिंता दाखवत आहे. दिवस जपून राहण्याचा आहे. मिथुन राशीच्या अष्टम स्थानातून निघालेला शनी फार मोठा बदल करेल. प्रकृती ठिक राहिल. नवीन संधी मिळतील. चंद्रभ्रमण प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे. कर्क अष्टम स्थानात प्रवेश करणार शनी काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता दशम चंद्र कार्यक्षेत्रात घडामोडी होतील. दिवस उत्तम. सिंह सप्तम स्थानात शनी, मंगळ जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्रभ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ. कन्या षष्ठ स्थानातील शनी, मंगळ शत्रूपासून सुटका देतील. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण आणि अमावस्या घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम. तूळ संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या. चंद्रभ्रमण जोडीदारासोबत वेळ घालवा असं सुचवत आहे. वृश्चिक राशी स्वामी मंगळ, शनीसोबत चतुर्थ स्थानात असून गृहकलह किंवा वाहन अपघात यापासून जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा दिवस मध्यम. धनु चतुर्थ स्थानात गुरू शुक्र वास्तू योग आणतील. भावंडं भेटतील. त्यांना जपा. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम. मकर राशीतून पुढे जाणारा शनी हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस. कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला शनी, मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. नुकसान होण्याची शक्यता. दिवस मध्यम. मीन व्यय स्थानातील शनी, मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू, शुक्र शुभ फळ देतील. दिवस उत्तम. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या