Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज शुक्र-राहू-चंद्र त्रिग्रही योग; 'या' राशीवर होणार परिणाम

दैनंदिन राशिभविष्य : आज शुक्र-राहू-चंद्र त्रिग्रही योग; 'या' राशीवर होणार परिणाम

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Daily Horoscope 28 May 2022 : चंद्र आज मेष राशीत असून तिथं शुक्र राहू चंद्र त्रिग्रही योग बनेल.

आज दिनांक 28 मे 2022. शनिवार. आज वैशाख कृष्ण त्रयोदशी. चंद्र आज मेष राशीत असेल. शुक्र राहू चंद्र त्रिग्रही योग बनेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष राशीमध्ये असलेले तीन ग्रह मनस्थिती किंचित दोलायमान करतील. मंगळ व्यय स्थानात गुरूसोबत ही ग्रहस्थिती अचानक आर्थिक घडामोडी घडवेल. घरात फार काम पडेल. दिवस उत्तम जाईल. वृषभ गुरू मंगळ भ्रमण स्त्रियांना चांगले असून कार्यक्षेत्रात मदत करेल आणि शारीरिक ताण निर्माण होईल. व्यय चंद्र शुक्र राहू काही विशेष खर्च देतील. दिवस चांगला. मिथुन राशी स्वामी बुध व्यय स्थानात असून काही नवीन संधी मिळवून देइल. महत्त्वाचे संपर्क होतील. आर्थिक लाभ होतील. घराचे शुभ योग येतील. दिवस उत्तम जाईल. कर्क चंद्र आज दशम स्थानात आहे. घरी आणि कार्यक्षेत्रात धावपळ होईल. जास्तीची जबाबदारी येईल. प्रकृती मध्यम राहिल. दिवस उत्तम. सिंह शनी सप्तम स्थानात तर रवी दशम स्थानात असून जवळच्या नातेवाईकांना शुभ. चंद्र अध्यात्मिक लाभ मिळवून देतील. भाग्यकारक योग येतील. दिवस शुभ आहे. कन्या आज आर्थिक चिंता आणि वैवाहिक आयुष्यात ताण देणारा दिवस आहे. घरात शांत राहा. फार ताण घेऊ नका. मन उदास वाटेल. ग्रहांचा प्रभाव जाणवेल. दिवस मध्यम जाईल. तूळ शनी पंचम तर सप्तम स्थानात चंद्र राहू शुक्र आहेत. कार्यालयात काळजी घ्या. घरामध्ये मोठे खर्च निघतील. जोडीदाराची काळजी घ्या. भेटी होतील. दिवस बरा जाईल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ पंचम स्थानात, शनी चतुर्थ स्थानात. हळूहळू परिस्थिती सुधारेल. षष्ठ चंद्र आहे. आरोग्याची काळजी घ्या. दिवस बरा जाईल. धनु तृतीय शनी आणि चतुर्थ गुरू मंगळ शुभ असून घरामध्ये सुधारणा घडवून आणतील. पंचम स्थानातील चंद्र शुभ आहे. दिवस शांतपणे घालवा. मकर शनी महाराज काही विशिष्ट ताण देतील. चंद्र त्यात सुधारणा करेल. दिवस अनुकूल. जोडीदार आनंदी राहिल. तुम्ही घरात व्यस्त राहाल. खर्च जपून करा. दिवस शुभ. कुंभ धन स्थानातील गुरू मंगळ आर्थिक लाभ देतील. राशीतील शनी जोडीदाराला त्रासदायक ठरेल. चंद्र राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. मीन राशीतील गुरू मंगळ आणि चंद्र आर्थिक उलाढाल दाखवत आहे. लाभ होतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस आनंदाचा ठरेल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या