Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज प्रवास योग आहे पण तुम्ही प्रवासावर जावं की नाही तुमची राशी काय सांगते पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आज प्रवास योग आहे पण तुम्ही प्रवासावर जावं की नाही तुमची राशी काय सांगते पाहा

Daily horoscope 27 May 2022 : आज प्रवास योग असला तर काही राशींच्या व्यक्तींनी तो टाळणंच योग्य ठरेल.

आज दिनांक 27 मे 2022. वार शुक्रवार. तिथी वैशाख कृष्ण द्वादशी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर मेष राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक जीवन प्रसन्न राहिल. दिवसाचा काही काळ हा चिंतनात घालवाल. आर्थिक आणि व्यवसाय वृद्धी संभवते. दिवस आनंदात जाईल. वृषभ आर्थिक बाबतीतली गणितं कष्ट देणारी ठरतील. काही निर्णय तापदायक होऊ शकतात. प्रवास योग देखील टाळा. संततीची चिंता होईल. दिवस मध्यम आहे. मिथुन चंद्राचे भ्रमण कामाच्या ठिकाणी भरपूर लाभ देईल. मुलं ताण देतील. कार्यक्षेत्रात भरपूर काम राहिल. आर्थिक लाभ होतील. आईवडील आनंदी राहतील. दिवस शुभ. कन्या आज तुमच्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्ती काहीतरी विशेष करतील. भेट वस्तू मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रकृती चांगली राहिल. दिवस उत्तम. तूळ काही कष्ट घेऊन आजचा दिवस उगवेल. जास्तीचे काम करण्याचा, प्रवास, भेटीगाठीचा दिवस आहे. धार्मिक स्थळांना भेट द्यावी अशी इच्छा होईल. दिवस शुभ. वृश्चिक दिवस आजही संथपणे घालवण्याचा आहे. आर्थिक लाभ संभवतात. मात्र जोडीदाराची काळजी घ्या. प्रवास टाळा. दिवस शुभ आहे. धनु आज चंद्र कौटुंबिक सुखामध्ये वाढ करेल. दोघं एकत्र भेटवस्तू खरेदी कराल. आनंदी काळ आहे. कामाची गडबड राहिल. दिवस काही विशेष अनुभव देईल. मकर संततीला काही अडचण असेल तर आर्थिक मदत करावी लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल. तसंच हितशत्रूपासून सावध राहा. दिवस शुभ. कुंभ कुटुंबासोबत आनंदाने घालवण्याचा दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश देईल. वाचनात मन रमेल. भाग्यकारक गुरू यशाचा मार्ग दाखवेल. दिवस शुभ. मीन आज कार्यालयीन जास्तीची काम पार पाडून तुम्ही थकून जाल. प्रवास योग आहेत. आर्थिक ताण, काही खरेदी असा हा दिवस आहे. आईवडील खुश असतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या