Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; शनी ठरणार त्रासदायक

दैनंदिन राशिभविष्य : या राशीच्या व्यक्तींनी आज सावध राहावं; शनी ठरणार त्रासदायक

Horoscope 26 May 2022 : भाग्यात चंद्र आहे पण शनी सावध वागण्याचे संकेत देत आहे.

आज दिनांक 26 मे 2022. वार गुरुवार. तिथी वैशाख कृष्ण एकादशी. आज चंद्र रेवती नक्षत्रात मीन राशीत असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आत्मसन्मान आणि धैर्याची परीक्षा घेणार दिवस आहे. व्यय चंद्र घरामध्ये काही समस्या निर्माण करेल. मातृ चिंता सतावेल. घरात जबाबदारी वाढेल. मध्यम दिवस. वृषभ आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. मीन चंद्र लाभ देईल. दिवस मध्यम. मिथुन आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. मीन मंगळ अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ आहे. दिवस शुभ. कर्क भाग्यातील चंद्र आहे पण शनी सावध वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. नवीन घडामोडी होतील. शुभ दिवस. सिंह अष्टम चंद्र अधिक खर्च, दवाखान्याची फेरी असे परिणाम देईल. गुरू शुक्र जोडीदार निवडताना मदत करतील. शत्रू पराजित होतील मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम. कन्या मन काहीसे अस्वस्थ राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सर्व ठिक होईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ. तूळ खूप कामाच्या बोज्याने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठीक राहिल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस मध्यम. वृश्चिक पंचम स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात भाग घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. दिवस उत्तम. धनु आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तृतीय शनी आर्थिकदृष्ट्या कठीण असून शुक्राची पंचम स्थानातील उपस्थिती मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस घरात शांततेत जाईल. मकर राशीच्या तृतीय स्थानातील चंद्र जीवनात काही घडामोडी घडवेल. धन स्थानातील शनी त्रासदायक परिणाम देईल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. कुंभ मंगळ गुरू शनीवर अंकुश ठेवतील दवाखान्याची भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. मीन आज दिवस शैक्षणिकदृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या ठिक आहे. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या