Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण 'या' राशीने मात्र खर्च टाळावा

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण 'या' राशीने मात्र खर्च टाळावा

Horoscope 21 May 2022 : आज चंद्र राहुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 21 मे 2022 वार शनिवार. आज वैशाख कृष्ण षष्ठी. चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. तिथून तो राहुशी केंद्र योग करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज दशम चंद्र कार्यालयीन कामासाठी प्रवास योग घडवून आणेल. शुभ गुरूचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ. वृषभ आज भाग्यस्थानातील चंद्र कुटुंबासाठी काही विशेष खरेदी, आनंद आणि गृहसौख्य मिळेल. धार्मिक समारंभात भाग घ्याल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. उत्तम दिवस. मिथुन राशीच्या अष्टम स्थानातील चंद्र राहुशी विशेष योग करीत आहे, उच्च प्रतीचे अध्यात्मिक, गूढ अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. प्रकृती जपा. दिवस चांगला जाईल. कर्क सप्तम स्थानात चंद्र आणि गुरू काही अध्यात्मिक अनुभव देतील. आर्थिक बाजू उत्तम राहिल. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. प्रकृती उत्तम राहिल. दिवस मजेत जाईल. सिंह आज चंद्र राहू केंद्र योग आहे. आर्थिक लाभ झाल्यामुळे आनंदी राहाल. तसंच कुटुंबसुख लाभेल. प्रकृती नाजूक राहिल. जोडीदाराला वेळ द्या. दिवस शुभ. कन्या आज चंद्र पंचम स्थानात आहे. तुमच्यावर संततीच्या बाबत निर्णय घेण्याची वेळ येईल. सामाजिक जीवनात प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल. गुरू नोकरीकरता मदत करेल. दिवस शुभ. तूळ आज चतुर्थ चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. गृह आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती ठिक राहिल. खर्च होतील. दिवस शुभ. वृश्चिक आज घरात आनंदात राहण्याचा दिवस. चंद्र प्रकृतीसंबंधी अनिष्ट फळ देईल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. धनु आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. अचानक आर्थिक लाभ होतील. गुरू घरामध्ये शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल. मकर शनी धनस्थानात काही प्रकृतीचे त्रास, आर्थिक चिंता निर्माण होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. नातेवाईक भेट संभवते. मध्यम दिवस. कुंभ चंद्र राहू योग आज सांभाळून दिवस घालवा असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. खर्च टाळा. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग. दिवस शुभ. मीन आज चंद्र आर्थिकदृष्ट्या घडामोडी घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना घडतील. लाभ होतील. धार्मिक स्थानाचा प्रवास होईल. दिवस शुभ आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या