Home /News /astrology /

Daily horoscope : या राशींना होणार धनलाभ तर या राशींनी जपून खर्च करणंच राहिल फायद्याचं

Daily horoscope : या राशींना होणार धनलाभ तर या राशींनी जपून खर्च करणंच राहिल फायद्याचं

Daily horoscope 20 January : पाहा तुमचं आजचं राशिभविष्य.

आज दिनांक 20 जानेवारी 2022. वार गुरुवार तिथी पौष कृष्ण तृतीया. आज चंद्र सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी मघा नक्षत्रात प्रवेश करेल. सिंह रास असून सूर्य धनू राशीत असेल. गुरू चंद्र शुभ योग करतील. पाहूया आजचं बारा राशींचे भविष्य. मेष आज काहीशी संतती चिंता सतावू शकते. मुलांना वेळ द्यावा लागेल. नवीन काही वाचन किंवा अभ्यास कराल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दिवस शांततेत घालवा. वृषभ आज दिवस घरासाठी काही नवीन योजना करण्यात जाईल. हित शत्रू टिकणार नाहीत. आरोग्य चांगलं राहिल. उत्तरार्ध आनंदात जाईल. दिवस चांगला आहे. मिथुन भावंडांची जबाबदारी वाढेल. काही महत्त्वाचे निरोप अथवा संभाषण होईल. खर्च जरा जपून करा. घरासाठी काही नवीन खरेदी होईल. कार्यक्षेत्रात सर्व काही नेहमी प्रमाणे सुरू राहिल. दिवस शुभ. कर्क आज दुपारनंतर काही धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तुमचं मनोबल उत्तम राहिल. उत्तरार्ध जास्त शुभ असेल. मानसिक शांतता लाभेल. शिवाची उपासना करावी. सिंह राशीतील चंद्र दुपारनंतर शुभ आहे. आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख मिळेल. गुरु कृपा राहिल. संतती अणि जोडीदार मनासारखे वागतील. दिवस बरा जाईल. कन्या राशीमध्ये आलेला शुक्र, व्ययस्थानातील चंद्र आज बरेच वैचारिक मंथन करायला लावेल. आर्थिक बाजू सांभाळा. शत्रूवर मात करणार आहात. दिवस चांगला जाईल. तुला नोकरी असणार्‍यांना उत्तम दिवस. कामं मार्गी लागतील. लाभ होतील. आरोग्य सांभाळा. आर्थिक बाजू चांगली राहिल. पण सौंदर्य प्रसाधनं, कपडे यावर खर्च होईल. चारित्र्य जपा. दिवस चांगला आहे. वृश्चिक तुमच्या मुळच्या जिद्दी स्वभाव आणि चिकाटीने काम करण्याच्या वृत्तीचा लोक फायदा घेतील. काही मित्रांपासून सावध रहा. कार्यक्षेत्रातील केलेलं काम चांगलं फळ देईल. दिवस शुभ. धनु दुपारनंतर दिवस हळूहळू अनुकूलता वाढवणारा आहे. मानसिक ताण कमी होईल. ईश्वरी उपासना करावी. काहींना महत्त्वाचा निरोप येईल. गृहसौख्य उत्तम राहिल. दिवस चांगला आहे. मकर आज दिवस  थोडा त्रासदायक ठरू शकतो. पण दुपारपर्यंत कामं उरकून घ्या. मुलांना हवा तसा वेळ द्याल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. आर्थिक बाजू चांगली राहिल. दिवस मध्यम जाईल. कुंभ आज तुम्ही अध्यात्मिक वाचन कराल. पूजेत मन रमेल. मौल्यवान वस्तू सांभाळा. आर्थिक स्थिती ठिक राहिल. प्रकृतीकडे लक्ष देण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल. मीन आज काही नवीन ओळखी व्यवसाय पूरक ठरतील. येणार्‍या काळात नोकरी व्यवसाय चांगला चालेल. आज जास्त दगदग ना करता दिवस  शांततेत घालवा. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या