मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /बाराही राशींना करावा लागू शकतो अडचणींचा सामना; तुमच्या राशीत काय पाहा आजचं राशिभविष्य

बाराही राशींना करावा लागू शकतो अडचणींचा सामना; तुमच्या राशीत काय पाहा आजचं राशिभविष्य

Horoscope 18 May 2022 : आज प्रत्येक राशीत काही ना काही अडचण आहे. तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार पाहा.

Horoscope 18 May 2022 : आज प्रत्येक राशीत काही ना काही अडचण आहे. तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार पाहा.

Horoscope 18 May 2022 : आज प्रत्येक राशीत काही ना काही अडचण आहे. तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागणार पाहा.

आज दिनांक 18 मे 2022. वार बुधवार. तिथी वैशाख कृष्ण तृतीया. आज चंद्राचे भ्रमण ज्येष्ठा नक्षत्रातून असेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

अष्टम चंद्र आणि लाभ स्थानातील शनी मानसिक ताण निर्माण करतील. भाग्येश गुरू, शुक्र, मंगळ व्यय स्थानात आहे. धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. दिवस मध्यम.

वृषभ

दशम स्थानातील शनी पितृ चिंता, कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराला नुकसान, आर्थिक चिंता दाखवत आहे. दिवस जपून राहण्याचा आहे .

मिथुन

राशीच्या षष्ठ स्थानात चंद्र आणि शनी बदल परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणेल. प्रकृती ठिक राहिल. चंद्र भ्रमण प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे.

कर्क

पंचम स्थानात प्रवेश करणार चंद्र काही काळ संततीची काळजी घेण्याचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता. दिवस मध्यम.

सिंह

सप्तम स्थानात शनी जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून घरात काही धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ.

कन्या

षष्ठ स्थानातील शनी शत्रूपासून सुटका देइल. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण प्रवास घडवून आणेल. अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तूळ

संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. पोटाची काळजी घ्या. चंद्र भ्रमण कुटुंबासोबत वेळ घालवा असं सुचवत आहे.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ गुरूसोबत पंचम स्थानात येत असून संतती किंवा शैक्षणिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम.

धनु

चतुर्थ स्थानात गुरू, शुक्र, मंगळ वाहन आणि वास्तूयोग आणतील. आईवडील भेटतील. त्यांना जपा. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम.

मकर

राशीतून पुढे जाणारा शनी आणि तृतीय मंगळ हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस .

कुंभ

राशीमध्ये प्रवेश केलेला शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. काळजी घ्या. दशम चंद्र कार्यक्षेत्रात लाभ होण्याची शक्यता. दिवस उत्तम.

मीन

व्यय स्थानातील शनी आणि राशीत येणारा मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक लाभ संभवतो. राशीतील गुरू शुक्र अध्यात्मिक उंची देतील. दिवस उत्तम.

शुभम भवतू!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs